Wimbledon Tennis: ॲलेक्झँडर झ्वेरेव अंतिम फेरीत; विंबल्डन टेनिस, आर्थर फेरीवर तीन सेटमध्ये मात

Alexander Zverev Wimbledon Final: जर्मनीचा अनुभवी टेनिसपटू व दुसरा मानांकित ॲलेक्झँडर झ्वेरेव याने शुक्रवारी पहिल्यांदाच विंबल्डन टेनिस ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली.
Alexander Zverev Wimbledon Final
Wimbledon TennisDainik Gomantak
Published on
Updated on

लंडन: जर्मनीचा अनुभवी टेनिसपटू व दुसरा मानांकित ॲलेक्झँडर झ्वेरेव याने शुक्रवारी पहिल्यांदाच विंबल्डन टेनिस ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ब्रिटनच्या आर्थर फेरी याच्यावर सरळ तीन सेटमध्ये ७-६, ६-२, ६-४ अशी मात केली. फ्रेंच ओपननंतर त्याने सलग दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली.

ॲलेक्झँडर झ्वेरेव-आर्थर फेरी यांच्यामधील उपांत्य लढत एकतर्फी झाली. पहिल्या सेटमध्ये थोडीफार झुंज पाहायला मिळाली. दोन खेळाडूंमध्ये ६-६ अशी बरोबरी झाल्यानंतर टायब्रेकमध्ये ॲलेक्झँडर झ्वेरेव याने यश मिळवले व ७-६ अशी बाजी मारली. पुढील दोन सेटमध्ये ॲलेक्झँडर झ्वेरेवच्या झंझावातापुढे आर्थर फेरीचा निभाव लागला नाही. जर्मनीच्या पठ्ठ्याने दुसरा सेट ६-२ असा पटकावल्यानंतर २-० अशी आघाडीही घेतली.

Alexander Zverev Wimbledon Final
Ponda Table Tennis Tournament: फोंड्यात टेबल टेनिसचा थरार! 11 वर्षांखालील मुलींच्या उपांत्य फेरीत अनाया, शौर्या, त्विषाची दमदार एन्ट्री

त्यानंतर तिसरा सेट ६-४ असा खिशात घालत सामना आपल्या नावावर केला. ॲलेक्झँडर झ्वेरेव याने दोन तास व १४ मिनिटांत ही लढत जिंकली. पाचव्यांदा फायनलमध्ये ॲलेक्झँडर झ्वेरेव याने कारकिर्दीत एकंदरीत पाचव्यांदा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली आहे. याआधी ॲलेक्झँडर झ्वेरेव याने २०२० मध्ये अमेरिकन ओपनची, २०२४ मध्ये फ्रेंच ओपनची, २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनची, २०२६ मध्ये पुन्हा फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली होती.

आता विम्बल्डनची अंतिम फेरी गाठताना त्याने उल्लेखनीय खेळ केला आहे. यंदा तीनही ग्रँडस्लॅममध्ये यश ॲलेक्झँडर झ्वेरेव याने यंदाच्या तीनही ग्रँडस्लॅममध्ये छान प्रदर्शन केले आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत त्याने मजल मारली, मात्र कार्लोस अल्काराझ याच्याकडून त्याला हार पत्करावी लागली. यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले. उपांत्य फेरीपर्यंत त्याने केलेली कामगिरी काबिल ए तारीफ ठरली. त्यानंतर फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत त्याने फ्लॅवियो कोबोली याला पराभूत करीत पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. आता विंबल्डनच्या अंतिम फेरीत त्याने प्रवेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com