अक्साई चीन अन् अरुणाचल प्रदेश भारतातच हिस्सा; चीनी नकाशातून स्पष्ट

चीन सीमा शुल्क विभागाने (China Customs Department) नुकतच स्थानीय स्वरुपात बनविण्यात आलेल्या नकाशांची एक मोठी खेप जब्त केली आहे.
China Maps
China MapsDainik Gomantak
Published on
Updated on

चीन सीमा शुल्क विभागाने (China Customs Department) नुकतच स्थानीय स्वरुपात बनविण्यात आलेल्या नकाशांची एक मोठी खेप जब्त केली आहे. ज्यामध्ये अक्साई चीन (Aksai Chin) आणि अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) राज्याला भारताचा अविभाज्य भाग असल्याचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला होता. चीन पहिल्यापासूनच अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करत आला आहे. तसेच भारताकडून दावा करण्यात आलेल्या अक्साई चीनवर चीनने जबरदस्तीने कब्जा केला आहे. यामध्ये दक्षिण-पश्चिम होटन काउंटीचा (Hotan county) हिस्सा असल्याच्या स्वरुपामध्ये शिनजियांग उईगर स्वायत्त क्षेत्राचा देखील समावेश आहे.

China Maps
China: "याद राखा डोकं ठेचू" शी जिनपिंग यांची अन्य राष्ट्रांना धमकी

शंघाई पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर पर सीमा शुल्क विभागाने 600 डॉलर मूल्य असणाऱ्या मानचित्रांची खेप जब्त केली आहे. ThePaper.com वेबसाईटची रिपोर्टनुसार, बेड कॉर्पोरेटमध्ये एक्सपोर्ट केल्याने कमीतकमी 300 पॅकेज चेक-अप करण्याच्या दरम्यान एका एक्सप्रेस चॅनेल्या माध्यमातून काढण्यात आले.यामध्ये हे दिसून आले की, अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन हा भारताचा भाग असल्याचे दाखविण्यात आले आहे. जसे की भारताच्या नकाशामध्ये या प्रदेशांचे स्थान अधोरेखित करण्यात येते.

China Maps
भारत-चीन यांच्यातील सीमावादार आज कोर कमांडर स्तरावर चर्चा

चिनी नकाशे बनवण्याच्या कायद्याचे उल्लंघन

चीनी माध्यमांच्या वृत्तानुसार हे नकाशांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ज्यांनी चीनी नकाशे बनविण्याच्या कायद्यांचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले जात आहे. या नियमाची तरतूद चीनच्या राज्य परिषद आणि कॅबिनेटच्या मानचित्र आरेखण आणि प्रकाशनाच्या प्रबंधन अधिनिययमांतर्गत येते. हा नियम सांगतो की, चीनी नकाशांमध्ये अशाप्रकरच्या घटकांचा उल्लेख करणे निषेधार्य मानले जाते. जो राष्ट्रीय एकता, संप्रुभता आणि क्षेत्रीय अखंडतेला धोका मानला जातो. ThePaper.com या वेबसाइटवरील लेखांमधील नकाशे तयार करण्याची निर्मीती आणि त्याची विक्री करण्यात येणार होती यासबंधीची माहिती मात्र देण्यात आली नाही.

China Maps
US-China Relations: चीन-अमेरिका चर्चा सुरु मात्र...

2019 मध्येही असेच नकाशे नष्ट करण्यात आले

असा विश्वास आहे की ही खेप नष्ट केली जाईल आणि अशाप्रकारचे नकाशे बनविणाऱ्या कंपनीला दंड ठोठावला जाईल. नकाशाबद्दल माहिती मिळताच चिडलेल्या चिनी सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कंपनीला ताबडतोब बंद करण्यात यावे आणि अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, नकाशा बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला शिक्षा ठोठाविण्यात यावी. याआधी मार्च 2019 मध्ये, शेडोंगच्या पूर्व प्रांतातील किंगदाओ शहरात कस्टम अधिकाऱ्यांनी अरुणाचल प्रदेशला भारत आणि तैवानला स्वतंत्र देश म्हणून दर्शवणारे जवळपास 30,000 जागतिक नकाशे नष्ट केले होते. अरुणाचल प्रदेशला भारतीय भूभागाचा भाग म्हणून दाखवण्यास चीन विशेषतः जास्त संवेदनशील आणि भारतीय नेत्यांकडून देण्यात येणाऱ्या भेटींना देखील विरोध करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com