China: "याद राखा डोकं ठेचू" शी जिनपिंग यांची अन्य राष्ट्रांना धमकी

पार्टीच्या शताब्दीनिमित्त तिआनमेन चौकात तासभर केलेल्या भाषणामध्ये लष्कर प्रबळ करण्यापासून , तैवानला चीनमध्ये(China) एकजीव करणं आणि हाँगकाँगमध्ये सामाजिक स्थैर्य आणणं हे अग्रक्रम असल्याचं जिनपिंग यांनी सांगितलं आहे
China: Xi Jinping warns other nations
China: Xi Jinping warns other nationsDainik Gomantak
Published on
Updated on

चीनच्या(China) कम्युनिस्ट पार्टीच्या(chinese community party) शताब्दीनिमित्त देशाला संबोधित करताना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग(Xi Jinping) यांनी जगाला एक इशारा दिला आहे "चीनविरोधात दादागिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विदेशी शक्तींचं डोकं ठेचू" अशा शब्दांमध्ये त्यांनी चीनविरोधात कारवाई करणाऱ्या राष्ट्रांना खडे बोल सुनावले आहेत. . चीनच्या जनतेनं नवं विश्व उभं केलं असून चीन आज प्रत्येक क्षेत्रात पुढं आहे असे सांगत चीनच्या जनतेचं त्यांनी अभिनंदन ही केलं आहे.

पार्टीच्या शताब्दीनिमित्त तिआनमेन चौकात तासभर केलेल्या भाषणामध्ये लष्कर प्रबळ करण्यापासून , तैवानला चीनमध्ये एकजीव करणं आणि हाँगकाँगमध्ये सामाजिक स्थैर्य आणणं हे अग्रक्रम असल्याचं जिनपिंग यांनी सांगितलं आहे . चीनच्या एका वाहिनीने या संदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. जुन्या विश्वाला गाडण्यात केवळ चिनी जनता कुशल नाही तर आपण नवं विश्व निर्माण केलं आहे असं ते म्हणाले. जिनपिंग यांनी यावेळी केवळ समाजवादच चीनला तारू शकतो असंही म्हटलं आहे.

China: Xi Jinping warns other nations
सौरऊर्जेसाठी भारताचे प्रयत्न जगासाठी एक उदाहरण आहे: प्रिन्स चार्ल्स

झिंजियांगमध्ये अल्पसंख्याकांना दिली जाणारी वागणूक आणि हाँगकाँगमधली दडपशाही यामुळे चीनवर वंशभेदाचा आरोप जागतिक पातळीवर होत असताना आम्ही हे सहन करणार नसून कुठल्याही विदेशी शक्तींच्या दादागिरीला, दबावाला बळी पडणार नाही वा कुणाच्या ताटाखालचं मांजर होणार नाही आणि तसा कोणी प्रयत्न केलाच तर त्यांची डोकी १.४ अब्ज चिनी जनता ठेचेल असा इशारा त्यांनी दिला आहे. चिनी जनतेनेही जिनपिंग यांच्या या वक्तव्याचं प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं.

चीनी लष्कराचं अत्याधुनिकीकरण अत्यंत वेगानं करत असून त्यामुळे शेजारी देशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे असून आम्ही सदैव सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तयार असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगिलते आहे.

शी जिनपिंग यांनी केलेल्या या भाषणाने साऱ्या जागाच लक्ष आता चीनकडे वळलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com