नवी दिल्ली: भारत आणि चीन (India and China) यांच्यात मागील काहीदिवसांपासून सुरु असलेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसत असून, दोन्ही देशांमध्ये आज सीमावादावर (Boundary dispute) चर्चा (Discussion) होणार आहे. आज (शनिवारी) सकाळी 10.30 वाजता या चर्चेला सुरुवात होईल. कोर कमांडर स्तरावर (At the core commander level) या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत आणि चीनमध्ये मागील काहिदिवसांमध्ये सीमेवादावरुन तणाव वाढला होता. 9 एप्रिलला झालेल्या चर्चा झाली होती, त्यावेळी भारताने स्पष्ट केले होते हा सीमावाद कमी करावयाचा असेल तर चीनने सर्व विवादीत भागातून सैन्य मागे घ्यावे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये 11 वेळा याबाबत चर्चा झाली आहे. यानंतर पैगोंगच्या भागातून दोन्ही देशांनी सैन्य माघे घेतले आहे. त्यानंतर आता साडेतीन महिन्यानंतर ही चर्चा होत आहे. चीनकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या कुरापतीमुळे बैठकींचा सिलसिला पुढे ढकलण्यात येत होता.
फेब्रुवारी 2021 मध्ये पैगोंग लेक मधून चीनने आपले सैन्य माघारी घेतल्यानंतर चीनचा भूमिका काहीप्रमाणात बदलली आहे. पूर्व लडाखमधून देखील सीमारेषेवरुन देखील चीनने आपले सैन्या माघारी बोलावले आहे. परंतु इतर सीमाभागातून देखील चीन आपले सैन्य हटविण्याच्या तयारीत नाही, त्यामुळे दोन्ही देशात तणाव परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने आजची चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. चीनने मे 2020 मध्ये एसओसीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावात्मक वातावरण होते. पण दोन्ही देशांत बैठकांचे सत्र सुरु झाले. 25 जून 2021 ला दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांमध्ये देखील चर्चा झाली, त्यामध्ये दोन्ही सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा करण्यात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.