Kabul Blast: काबूलमध्ये मोठा स्फोट, तालिबान सरकारमधील मंत्र्यासह 12 जण ठार!

Taliban Minister Khalil Rehman Haqqani: तालिबानचे मंत्री खलील रहमान हक्कानी आणि त्यांच्या तीन अंगरक्षकांसह 12 जण या स्फोटात ठार झाले.
Kabul Blast: काबूलमध्ये मोठा स्फोट, तालिबान सरकारमधील मंत्र्यासह 12 जण ठार!
KabulDainik Gomantak
Published on
Updated on

Kabul Blast: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मोठा स्फोट झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचे मंत्री खलील रहमान हक्कानी आणि त्यांच्या तीन अंगरक्षकांसह 12 जण या स्फोटात ठार झाले. वृत्तानुसार, हक्कानी खोस्तहून आलेल्या लोकांच्या एका गटाला होस्ट करत असताना हा हल्ला झाला. तालिबान सरकारने ‘द खोरासान डायरी’शी संवाद साधत या घटनेला दुजोरा दिला आहे.

काबूलच्या मंत्रालयात आत्मघातकी हल्ला!

राजधानी काबूलमधील (Kabul) मंत्रालयाच्या आवारात हा स्फोट कसा झाला आणि कोणी घडवून आणला याबाबत सध्या फारशी माहिती समोर आलेली नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे हा आत्मघाती हल्ला मानला जात आहे, मीडिया रिपोर्ट्सनुसार या स्फोटात आत्मघाती हल्लेखोराचाही मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.

Kabul Blast: काबूलमध्ये मोठा स्फोट, तालिबान सरकारमधील मंत्र्यासह 12 जण ठार!
Kabul Blast: काबूलमध्ये नमाजच्या वेळी मशिदीत स्फोट, अनेकांचा मृत्यू

खलील रहमान यांचा हक्कानी नेटवर्कशी संबंध

खलील रहमान हक्कानी हे तालिबानचे मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका आणि हक्कानी नेटवर्कमधील एक प्रमुख व्यक्ती आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबान सत्तेत परतल्यानंतर, 7 सप्टेंबर 2021 रोजी त्यांची कार्यवाहक मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आली.

Kabul Blast: काबूलमध्ये मोठा स्फोट, तालिबान सरकारमधील मंत्र्यासह 12 जण ठार!
Kabul Bomb Blast शी केरळमधील 14 लोकांचा संबंध, दोन पाकिस्तानी गजाआड- रिपोर्ट

स्फोटात ISIS चा हात असल्याचा संशय!

इस्लामिक स्टेट आणि तालिबान यांच्यात सुरु असलेल्या संघर्षादरम्यान टार्गेट करुन हल्ला केलेला असू शकतो असा दावा प्राथमिक अहवालात केला जात आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. अहवालानुसार, इस्लामिक स्टेट (ISIS-K) च्या खोरासान प्रांताने वारंवार असे हल्ले केले आहेत, ज्यामुळे अलीकडील काही महिन्यांत तालिबान सरकारसोबत तणाव वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com