Kabul Bomb Blast शी केरळमधील 14 लोकांचा संबंध, दोन पाकिस्तानी गजाआड- रिपोर्ट

काबूल विमानतळावर (Kabul Airport) झालेल्या स्फोटात 13 अमेरिकन सैनिकांसह 200 हून अधिक लोक ठार झाले.
Kabul Airport
Kabul AirportDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी असलेल्या काबूल (Kabul) विमानतळावर बॉम्बस्फोट करणाऱ्या इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन प्रॉव्हिन्स (ISKP) या दहशतवादी संघटनेत केरळचे 14 लोक सामील असल्याचे म्हटले जात आहे. असेही म्हटले जात आहे की, या लोकांना तालिबानने बाग्राम जेलमधून सोडले होते. या व्यतिरिक्त, तुर्कमेनिस्तान दूतावासावर (Turkmenistan Embassy) हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे दोन पाकिस्तानी देखील अटकेत असल्याची माहिती समोर येत आहे. काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटात 13 अमेरिकन सैनिकांसह 200 हून अधिक लोक ठार झाले.

Kabul Airport
दहशतवादाविरोधात जगाने एकत्र यावे; UNSC मध्ये भारताने व्यक्त केली प्रतिक्रिया

माध्यमांच्या अहवालानुसार, केरळमधील 14 रहिवासी अफगाणिस्तानात ISKP चा भाग बनले आहेत. असे समजले जाते की, या 14 केरळी लोकांपैकी एकाने त्याच्या घरी संपर्क साधला होता, तर 13 जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. मलाप्पूरम, कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यांतील एक गट 2014 मध्ये मोसुलमध्ये स्वतःला इस्लामिक स्टेट म्हणवणाऱ्या दहशतवादी संघटनेने पकडल्यानंतर जिहादींमध्ये सामील होण्यासाठी भारतातून पळून गेला होता. यातील काही कुटुंबे त्यानंतर ISKP अंतर्गत अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात राहू लागली होती.

दरम्यान, या अहवालात अफगाणिस्तानातून येणाऱ्या अहवालांचा हवाला देण्यात आला आहे की, काबुल हक्कानी नेटवर्कच्या नियंत्रणाखाली असून पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या नांघर प्रांतातील जादरान पश्तून कुळ आणि जलालाबाद-काबूलमध्येही त्यांचा प्रभाव आहे. HT च्या अहवालानुसार, ISKP ने यापूर्वी हंगानी प्रांतातील हक्कानी नेटवर्कसोबत काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com