Afghanistan Drone Attack: सीमेवरील गोळीबाराचा अफगाणिस्ताननं घेतला बदला! अफगाण वायूसेनेचा पाकिस्तानात घुसून मोठा हवाई हल्ला; दहशतवादी तळ उद्ध्वस्त

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावाद आणि राजकीय तणाव आता अत्यंत टोकाच्या पातळीवर पोहोचला.
Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Afghanistan Drone AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावाद आणि राजकीय तणाव आता अत्यंत टोकाच्या पातळीवर पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या चिथावणीखोर कारवायांना आणि गोळीबाराला अफगाणिस्तानने अत्यंत कडक आणि तितकेच थरारक चोख उत्तर दिले. अफगाणिस्तानच्या वायूसेनेने थेट पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात घुसून तेथील अनेक दहशतवादी तळांवर ड्रोनद्वारे एकामागून एक ताबडतोब हल्ले केले.

अफगाण लष्कराने अचानक केलेल्या या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानचे सुरक्षा दल, गुप्तहेर यंत्रणा आणि तेथे सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. या कारवाईमुळे दोन्ही शेजारील देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण सीमारेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला.

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानच्या एअरस्ट्राईकनंतर अफगाणिस्तानचा पलटवार; 55 पाक सैनिक ठार, 19 चौक्यांवर तालिबानचा ताबा VIDEO

अफगाणिस्तान (Afghanistan) सरकारने या धाडसी कारवाईनंतर अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनानुसार, अफगाण वायूसेनेच्या आधुनिक ड्रोन्सनी बलुचिस्तानमधील किल्ला अब्दुल्ला जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या गुलिस्तान परिसराला आपले मुख्य लक्ष्य बनवले. अफगाण सैन्यांनी दावा केला की, या दुर्गम भागात जागतिक स्तरावर कुख्यात असलेल्या 'इसिस' (ISIS) या दहशतवादी संघटनेचे अनेक कॅम्प सक्रिय होते.

काही शत्रू देशांच्या गुप्तहेर संघटनांच्या इशाऱ्यावर आणि पाठिंब्याने या तळांचा वापर अफगाणिस्तानविरुद्ध मोठे आणि आत्मघातकी हल्ले करण्यासाठी केला जात होता. हे तळ नष्ट करणे अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचे होते, कारण येथूनच अफगाणिस्तानात अस्थिरता पसरवण्यासाठी सर्व ऑपरेशन्स हाताळली जात होती.

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Pakistan Afghanistan War: पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर 'एअरस्ट्राईक'; 72 तालिबानी ठार, 120 हून अधिक जण जखमी Watch Video

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य अफगाणिस्तानच्या सीमेवर सतत विनाकारण गोळीबार करत होते, ज्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचे नुकसान झाले होते. या चिथावणीनंतर अफगाणिस्तानने अतिशय कडक शब्दांत इशारा दिला होता की, ते पाकिस्तानच्या या कृत्याचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. शुक्रवारी भरदिवसा झालेला हा मोठा ड्रोन हल्ला म्हणजे अफगाणिस्तानने घेतलेला तोच भीषण बदला असल्याचे मानले जात आहे.

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

या भीषण हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या (Pakistan) सीमेवरील संरक्षण फळी पूर्णपणे कोलमडली असून दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार सुरु झाल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत असून दक्षिण आशियातील भूराजकीय परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. या वाढत्या तणावामुळे दोन्ही देशांतील नागरिक सध्या दहशतीच्या छायेत वावरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com