Hitler DNA Analysis: गंभीर लैंगिक आणि मानसिक आजाराचा सामना करत होता 'हिटलर'; DNA चाचणीतून झाला खळबळजनक खुलासा

Hitler Health Report : जगाचा नकाशा बदलू पाहणारा आणि लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला क्रूर हुकूमशहा एडॉल्फ हिटलर याच्या मृत्यूला आठ दशके उलटून गेली.
Hitler Health Report
HitlerDainik Gomantak
Published on
Updated on

Hitler DNA Analysis: जगाचा नकाशा बदलू पाहणारा आणि लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला क्रूर हुकूमशहा एडॉल्फ हिटलर याच्या मृत्यूला आठ दशके उलटून गेली. मात्र, आजही त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये जगाला थक्क करत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हिटलरचे डीएनए: ब्लूप्रिंट ऑफ अ डिक्टेटर' (Hitler's DNA: Blueprint of a Dictator) या दोन भागांच्या कार्यक्रमात संशोधकांनी हिटलरच्या डीएनए नमुन्याचे विश्लेषण करुन अनेक धक्कादायक अनुवांशिक निष्कर्ष समोर आणले आहेत. या संशोधनामुळे हिटलरच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीबाबत अनेक नवीन दावे केले जात आहेत.

'त्या' रक्ताळलेल्या सोफ्यावरुन मिळाले पुरावे

हे संशोधन हिटलरच्या त्या रक्ताच्या नमुन्यावर आधारित आहे, जे त्याच्या मृत्यूनंतर लगेचच बर्लिनमधील बंकरमधून मिळवले होते. ज्या सोफ्यावर हिटलरने स्वतःला गोळी झाडून घेतली होती, त्या रक्ताळलेल्या सोफ्यावरील नमुने संशोधकांनी गोळा केले. 'द आय पेपर'च्या वृत्तानुसार, वैज्ञानिकांनी या डीएनएची (DNA) सत्यता पडताळण्यासाठी हिटलरच्या एका ज्ञात नातेवाईकाच्या डीएनएशी त्याची तुलना केली, ज्यातून हा नमुना हिटलरचाच असल्याचे सिद्ध झाले. मात्र, संशोधकांनी असेही स्पष्ट केले की, जरी हा नमुना अधिकृत असला तरी, तो आपल्याला त्याच्याबद्दल किती अचूक माहिती देऊ शकतो, यावर अद्याप वाद सुरु आहेत.

Hitler Health Report
Donald Trump: टॅरिफमुळे अमेरिका बनला जगातील 'सर्वात श्रीमंत देश', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; म्हणाले, 'प्रत्येक नागरिकाला 2000 डॉलर देणार...'

'मायक्रोपेनिस' आणि लैंगिक विकाराचा दावा

या संशोधनातील सर्वात धक्कादायक दावा हिटलरच्या शारीरिक व्याधीशी संबंधित आहे. संशोधकांना त्याच्या डीएनएमध्ये 'कालमन सिंड्रोम' (Kallmann Syndrome) या अनुवांशिक उत्परिवर्तनाशी (Mutation) संबंधित खुणा सापडल्या आहेत. कालमन सिंड्रोम हा एक लैंगिक विकार असून तो मानवी लैंगिक विकासावर गंभीर परिणाम करतो. या स्थितीमुळे पुरुषांमध्ये जननेंद्रियाचा आकार अत्यंत लहान राहू शकतो, ज्याला 'मायक्रोपेनिस' (जर आकार 9.3 सेमी पेक्षा कमी असेल) असे म्हटले जाते.

याव्यतिरिक्त, या विकारामुळे 'अनडिसेंडेड टेस्टिकल्स' (Undescended Testicles) ही समस्या उद्भवते, ज्यामध्ये अंडकोष शरीराच्या आतच राहतात. हिटलरच्या वैद्यकीय नोंदींनुसार, त्याला उजव्या बाजूच्या अंडकोषाची समस्या होती, या जुन्या अफवांना आता या डीएनए अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे. मात्र, कालमन सिंड्रोमची लक्षणे व्यक्तीनुसार बदलू शकतात, त्यामुळे हिटलरवर याचा किती परिणाम झाला होता, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे.

Hitler Health Report
Donald Trump Dance: मलेशियात उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका! सोशल मीडियावर 'तो' भन्नाट डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का? VIDEO

मानसिक आरोग्य

संशोधकांनी हिटलरच्या न्यूरोडेव्हलपमेंटल स्थितीचाही अभ्यास केला. ऑटिझम आणि एडीएचडी (ADHD) सारख्या स्थिती शेकडो जनुकांच्या प्रभावामुळे निर्माण होतात. जेव्हा या सर्व जनुकांच्या एकत्रित प्रभावाचे विश्लेषण केले गेले, तेव्हा हिटलरच्या डीएनएमध्ये ऑटिझम आणि एडीएचडी असण्याची उच्च अनुवांशिक शक्यता दिसून आली.

तसेच, त्याच्या डीएनएमध्ये बायपोलर डिसऑर्डर (मॅनिक डिप्रेशन) आणि स्किझोफ्रेनिया (Schizophrenia) सारख्या गंभीर मानसिक आजारांचा उच्च धोका दिसून आला आहे. विशेष म्हणजे, हिटलरच्या स्वतःच्या डॉक्टरांनी त्याला त्यावेळी 'मॅनिक डिप्रेशन'चे निदान केले होते, जे आताच्या अनुवांशिक निष्कर्षांशी जुळते. मात्र, शास्त्रज्ञांनी सावध केले आहे की, अनुवांशिक भविष्यवाणी म्हणजे प्रत्यक्ष निदान नव्हे.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

हा अहवाल समोर आल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) चर्चांना उधाण आले आहे. काही यूजर्संनी यावर विनोदी आणि खोचक टीका केली. एका युजरने लिहिले, "विचार करा, दशकांपूर्वी मृत्यू होऊनही लोक अजूनही त्याची मानहानी करत आहेत." दुसऱ्या एका युजरने गमतीने म्हटले की, "आम्हाला तिसऱ्या महायुद्धापूर्वीच दुसऱ्या महायुद्धातील वैद्यकीय गुपिते समजली आहेत."

Hitler Health Report
Donald Trump: ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का? टॅरिफ रद्द झाल्यास अब्जावधी डॉलर्सचा परतावा देण्यासाठी ट्रेजरी विभाग सज्ज

काही लोकांनी याकडे गांभीर्याने पाहत असे मत व्यक्त केले की, सत्तेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तींची वैद्यकीय आणि मानसिक आरोग्य तपासणी कायदेशीररीत्या अनिवार्य करण्यासाठी या निष्कर्षांचा पुरावा म्हणून वापर केला पाहिजे. तर काहींनी, "80 वर्षांपूर्वी मेलेल्या व्यक्तीसाठी इतका पैसा आणि वेळ का खर्च केला जात आहे?" असा सवालही उपस्थित केला.

Hitler Health Report
Donald Trump: 'आणखी खरतनाक हल्ले केले जातील...', इस्त्रायलच्या कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला खुली धमकी

डीएनए अहवालातून मिळालेली माहिती आकर्षक असली तरी, केवळ डीएनएच्या जोरावर एखाद्या व्यक्तीच्या जटिल शारीरिक वैशिष्ट्यांबद्दल किंवा मानसिक आरोग्याबद्दल अंतिम निष्कर्ष काढता येत नाहीत. हा अभ्यास हिटलरच्या व्यक्तिमत्त्वाच्या गडद पैलूंकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतो, परंतु तो इतिहास किती बदलू शकेल, हे येणारा काळच ठरवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com