36 वर्षांपासून लॉकरमध्ये बंद आहे Queen Elizabeth यांचे रहस्यमय पत्र

2085 मध्येच उलघडणार पत्राचे रहस्य
Queen Elizabeth II
Queen Elizabeth IIDainik Gomantak
Published on
Updated on

राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे एक रहस्यमय पत्र सिडनी (Sydney), ऑस्ट्रेलिया येथील एका लॉकरमध्ये ठेवले आहे. पत्राबाबत सर्वात रंजक गोष्ट म्हणजे, पुढील 63 वर्षे ते पत्र उघडता येणार नाही. सिडनीतील एका ऐतिहासिक इमारतीत हे पत्र ठेवण्यात आले असून, महाराणी एलिझाबेथ यांनी 1986 मध्ये सिडनीच्या लोकांना उद्देशून लिहिले आहे.

Queen Elizabeth II
Guhagar Accident: गुहागर येथे दोन बसची समोरासमोर धडक, चालकांसह 25 ते 30 प्रवासी जखमी

ऑस्ट्रेलियातील 7NEWS या वृत्तवाहिनेने दिलेल्या वृत्तानुसार, या पत्रात काय लिहिले आहे हे राणीशिवाय इतर कोणालाही माहित नाहीये. त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांना देखील या पत्रातील मजकूराबाबत माहिती नाही. महाराणीचे हे रहस्यमय पत्र सुरक्षित ठिकाणी काचेच्या पेटीत लपवून ठेवले आहे. पण, 2085 पर्यंत हे पत्र कोणालाही उघडता येणार नाही.

सिडनीच्या लॉर्ड मेयरला उद्देशून लिहिलेल्या या पत्रात स्पष्टपणे असे लिहिले आहे की, "2085 साली कोणत्या तरी योग्य दिवशी तुम्ही हा लिफाफा उघडून सिडनीच्या नागरिकांना माझा संदेश पोहोचवाल का?" लिफाफ्यावर "एलिझाबेथ आर.." अशी स्वाक्षरी आहे. त्यामुळे या पत्रात महाराणीचा नेमका कोणता संदेश आहे, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Queen Elizabeth II
Sonali Phogat Case : सोनाली हत्या प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे सोपवणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com