Lockdown in Sydney : कोरोना नव्हे तर या कारणामुळे लॉकडाऊन; काही काळासाठी उडाली होती सर्वांचीच तारांबळ

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात काही काळ आपत्कालीन लॉकडाऊन
lockdown
lockdownDainik Gomantak
Published on
Updated on

Lockdown in Sydney :ऑस्ट्रेलियात सिडनी येथील टारोंगा प्राणीसंग्रहालयातील पाच सिंह त्यांच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले. पाच सिंह अचानक बाहेर आल्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही टुरिस्टही यावेळी होते. त्यांचीही पाचावर धारण बसली. त्यामुळे परिसरात आपात्कालीन लॉकडाऊन लागू करण्यात आले.

lockdown
North Korea-South Korea: उत्तर कोरियाने डागली 3 क्षेपणास्त्रे, दक्षिण कोरियात वाजू लागले सायरन

या सिंहांमध्ये एक वयस्क आणि इतर लहान सिंहांचा समावेश होता. मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. हे पाचही सिंह प्राणी संग्रहालयाच्या कुंपणापासून बाहेर आलेले नजरेस पडले. एका बांधकाम कामगाराला हे सिंह मैदानात दिसले. टुरिस्ट जिथे झोपतात तिथून हाकेच्या अंतरावर हा भाग आहे.

हे सिंह पिंजऱ्यातून बाहेर कसे पडले याचा शोध घेतला जात आहे. तथापि, सिंह त्यांच्या नेहमीच्या पिंजऱ्यातून बाहेर आल्यानंतर तत्काळ एक अलार्म जोरदार आवाजात वाजू लागला. त्यामुळे आपोआप लॉकडाऊन झाले. पोलिसांनीही प्राणी संग्रहालयाकडे धाव घेतली. सिंह रक्षकांनाही पोझिशन घेऊन उभे राहण्याच्या सुचना दिल्या गेल्या.

lockdown
Twitter Blue Tick Price: आता ट्विटरवर ब्लु टिकसाठी प्रत्येक महिन्यात मोजावे लागणार 'इतके' रूपये

सकाळी साडे नऊच्या सुमारास या सिंहांना पुन्हा पकडले गेले. आता हे सर्व सिंह पुन्हा त्यांच्या पिंजऱ्यात आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. उच्च प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी ही परिस्थिती चांगली हाताळली असे पोलिसांनी सांगितले.

टारोंगा प्राणीसंग्रहालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सध्या स्थिती नियंत्रणात आहे आणि प्राणी संग्रहालय नेहमीप्रमाणे खुले राहिल. बुधवारी सकाळी प्राणीसंग्रहालयात आपत्कालीन स्थिती उद्भवली होती. पाच सिंह त्यांच्या पिंजऱ्यातून बाहेर आले होते. अशा घटनांसाठी प्राणी संग्रहालयात कडक प्रोटोकॉल आहे. घटनास्थळी उपस्थित सर्व लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. पाहुणे आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.

यापुर्वी 2009 दक्षिण सिडनीतील मोगो प्राणी संग्रहालयात एक वाघीण पिंजऱ्याबाहेर पडली होती. लोकांच्या जीवाला निर्माण झालेल्या धोक्यामुळे त्या वाघीणीला गोळी मारून ठार मारण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com