PM Modi France Visit: फ्रान्सच्या एलिसी पॅलेसमध्ये अचानक वाजल 'हे' बॉलिवुडचे गाणं अन् पीएम मोदी पाहतचं राहिले, Watch Video

सर्व पाहुणे बँक्वेट हॉलमध्ये प्रवेश करताच हे गाणे प्रथम वाजवले गेले आणि नंतर रात्रीच्या जेवणाच्या शेवटी ते वाजवले गेले.
PM Modi France Visit
PM Modi France VisitDainik Gomantak
Published on
Updated on

Jai Ho Song Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवशीय दौऱ्यावर होते. 14 जुलै रोजी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये ए आर रेहमान यांचे 'जय हो' हे गाणे दोनदा वाजवण्यात आले. सर्व पाहुणे बँक्वेट हॉलमध्ये प्रवेश करताच हे गाणे प्रथम वाजवले गेले आणि नंतर रात्रीच्या जेवणाच्या शेवटी ते वाजवले गेले. या गाण्याचा व्हिडिओ व़त्तसंस्था एएनआयने ट्विट करत शेअर केला आहे.

"जय हो" हे गाणे 2008 च्या "स्लमडॉग मिलेनियर" चित्रपटातील आहे. त्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा अकादमी पुरस्कार मिळाला आहे. हे गाणे आशा आणि दृढनिश्चयाचे शक्तिशाली गीत आहे. या गाण्याचे गायक आणि संगीतकार ए आर रेहमान आहे.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान एलिसी पॅलेस येथे ही मेजवानी आयोजित करण्यात आली होती. पाहुण्यांमध्ये फ्रेंच मंत्री, व्यापारी नेते आणि फ्रान्समधील भारतीय समुदायाचे सदस्य होते. मेनूमध्ये पारंपारिक फ्रेंच पदार्थांसह भारतीय पदार्थांचा समावेश होता. जेवणानंतर भारतीय शास्त्रीय नृत्य पथक नृत्यग्रामचे सादरीकरण झाले.

PM Modi France Visit
Chandrayaan-3 Mission: चांद्रयान-3 मिशनबाबत ISRO ने दिली महत्त्वाची अपडेट, अंतराळात व्यवस्थित...
  • फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींचे ग्रॅंड वेलकम

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसच्या विमानतळावर पोहोचतांच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. त्यांच्या सन्मानार्थ 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला होता.

फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी (बॅस्टिल डे) पंतप्रधान मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पॅरिसमधील एका हॉटेलबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी भारतीय वंशाच्या लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी लोकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी लोकांची भेट घेतली होती.

  • पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 5 वेळा फ्रान्सचा दौरा केला

पहिला दौरा – 2015 मध्ये 9 ते 12 एप्रिल.

दुसरा दौरा - 1 डिसेंबर 2015

तिसरा दौरा - 2 जून 2017

चौथा दौरा- 22 ऑगस्ट 2019

पाचवा दौरा - 4 मे 2022

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com