10 वर्षीय बलात्कार पीडितेने "गर्भपातासाठी सरकारी नियम मोडले नाहीत", अमेरिकेत चर्चेला जोर

यूएस मध्ये, ओहायो पोलिसांनी पुष्टी केली की 10 वर्षीय बलात्कार पीडितेने राज्याच्या सीमेबाहेर गर्भपात केला.
US Government Ban on Abortion
US Government Ban on AbortionDainik Gomantak
Published on
Updated on

यूएस मध्ये, ओहायो पोलिसांनी पुष्टी केली की 10 वर्षीय बलात्कार पीडितेने राज्याच्या सीमेबाहेर गर्भपात केला. स्थानिक माध्यमांनी याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (U.S. Supreme Court) गर्भपाताचे अधिकार खोडून काढण्यासाठी आलेल्या या प्रकरणामुळे अमेरिकेतील महिलांच्या गर्भपाताच्या अधिकारावरील चर्चेला पुन्हा एकदा जोर आला आहे. (10 year old rape victim did not break government rules for abortion sparking debate in the United States)

US Government Ban on Abortion
कॉस्मेटिक सर्जरीसाठी आईनेच अज्ञाताला विकले 5 दिवसांचे बाळ

नवीन गर्भपात कायदा लागू झाल्यानंतर, मुलीला ओहायोच्या शेजारच्या इंडियाना राज्यात गर्भपातासाठी जावे लागले आणि गर्भपातासाठी मदत शोधणाऱ्या मुलींच्या कायद्यावर स्वाक्षरी करताना राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) यांनीही या कायद्याचा उल्लेख नुकताच केला होता.

पण ओहायो पोलिस डिटेक्टिव्ह जेफ्री हुन यांनी बुधवारी कोर्टात सांगितले की, मुलीचा इंडियानापोलिसमध्ये 30 जून रोजी गर्भपात करण्यात आला आहे. कोलंबस डिस्पॅट पेपरनुसार, हुन यांनी साक्ष दिली की मंगळवारी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली ज्याने मुलीवर बलात्कार केल्याचे कबूल केले आहे.

हुन यांनी न्यायालयाला असेही सांगितले की इंडियाना क्लिनिकमधून डीएनए नमुने देखील घेण्यात आले आहेत. ओहायोमधील फ्रँकलिन काउंटी कोर्टातील कागदपत्रांनी पुष्टी केली की 27 वर्षीय ग्रेसन फ्युएन्टेसला 13 वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे.

US Government Ban on Abortion
कार्यकर्ते लागले तयारीला...मुर्मूंचा विजय होताच दीड लाख गावांमध्ये भाजप करणार जंगी सेलिब्रेशन

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेतील गर्भपात कायद्याबाबत नव्या वादाला आता तोंड फुटले आहे. बिडेन यांनी 8 जुलै रोजी ओहायो रेप व्हिक्टिम्सशी देखील बोलले आहेत. बिडेन म्हणाले होते, "गेल्या आठवड्यातच अशी बातमी समोर आली होती की 10 वर्षांच्या बलात्कार पीडितेला गर्भपात करण्यासाठी राज्याबाहेर इंडियानाला जाण्यास भाग पाडले गेले आहे, तर त्या लहान मुलीचा विचार करा."

ओहायोचे अॅटर्नी जनरल डेव्ह योस्ट, यांनी गेल्या सोमवारी माध्यमांना सांगितले की प्रकरणाचा विपर्यास केला जात आहे. बलात्कार पीडितेला गर्भपातासाठी ओहायोच्या बाहेर गेल्याच्या दाव्याला पाठिंबा देणारा कोणताही पुरावा अध्याप मिळालेला नाही. अमेरिकेतील तेरा राज्यांनी गर्भपातास प्रतिबंध करणारे कायदे लागू केले आहेत, काही राज्यांनी बलात्कार आणि जवळच्या नातेसंबंधांच्या बाबतीतही गर्भपाताचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com