Earthquake Zones in India: भारतात 'या' 8 राज्यांना आहे भुकंपाचा सर्वाधिक धोका... जाणून घ्या भूकंपप्रवण क्षेत्रे

देशाच्या 59 टक्के भागात भुकंपाचा धोका, राजधानी दिल्लीचाही समावेश
Earthquake Zones in India
Earthquake Zones in IndiaDainik Gomantak

Earthquake Risk Zones in India: तुर्की, सिरियातील विनाशकारी भुकंपात शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या असून आतापर्यंत 8000 जणांचा मृत्यू झाला आहे.

या भुकंपाने जगभरातील देशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भारत भूकंपांबाबत किती संवेदनशील आहे?' याचीही चर्चा आता होऊ लागली आहे.

भारतातीलही अनेक राज्ये भूकंपाच्या बाबतीतही अत्यंत संवेदनशील आहेत. देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे.

Earthquake Zones in India
Turkey Earthquake: तुर्कीच्या भुगर्भात नेमकं चाललंय तरी काय? देश 10 फूट खचला...

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, भारतातील सुमारे 59 टक्के भूभाग वेगवेगळ्या तीव्रतेच्या भूकंपांच्या दृष्टीने संवेदनशील आहे. हा भाग असुरक्षित आहे.

आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील शहरे आणि गावे झोन-5 मध्ये आहेत आणि त्यांना सर्वाधिक तीव्रतेच्या भूकंपाचा धोका आहे. अगदी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) झोन-4 मध्ये आहे, जो दुसऱ्या क्रमांकाचा उच्च श्रेणी आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी जुलै 2021 मध्ये लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, "देशातील भूकंपांचा इतिहास पाहता भारताच्या एकूण भूभागापैकी 59 % भूभाग वेगवेगळ्या भूकंपांना बळी पडतो. हा भाग भुकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. देशाच्या सिस्मिक झोनिंग मॅपनुसार एकूण भुकंपप्रवण क्षेत्राचे चार सिस्मिक झोनमध्ये वर्गीकरण केले आहे.

झोन असे विभागलेले आहेत

झोन 5 मध्ये सर्वात तीव्र भूकंप होतात, तर सर्वात कमी तीव्रतेचे भूकंप झोन 2 मध्ये होतात. देशातील सुमारे 11 टक्के भाग झोन 5 मध्ये, 18 टक्के भाग झोन 4 मध्ये, 30 टक्के भाग झोन 3 मध्ये आणि उर्वरित क्षेत्र 2 मध्ये येते. गुजरात, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, मणिपूर, नागालँड, जम्मू आणि काश्मीर आणि अंदमान आणि निकोबार झोन-5 मध्ये येतात.

Earthquake Zones in India
Mehbooba Mufti: भाजपने काश्मिरचा अफगाणिस्तान केला; पॅलेस्टाईनची स्थिती आमच्यापेक्षा चांगली...

हिमालयीन प्रदेशात धोका सर्वाधिक आहे

मध्य हिमालयीन प्रदेश हा भूकंपदृष्ट्या जगातील सर्वात सक्रिय प्रदेशांपैकी एक आहे. 1905 मध्ये कांगडाला मोठा भूकंप झाला. 1934 मध्ये, बिहार-नेपाळ भूकंप झाला, ज्याची तीव्रता 8.2 इतकी होती आणि त्यात 10,000 लोक ठार झाले होते.

1991 मध्ये उत्तरकाशीमध्ये 6.8 तीव्रतेच्या भूकंपात 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2005 मध्ये काश्मीरमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. ज्यामध्ये 80,000 लोक मारले गेले.

राजधानी दिल्लीतही भूकंपाचा धोका

एका अहवालानुसार, दिल्ली तीन सक्रिय भूकंप रेषांजवळ स्थित आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमधील गुरूग्राम हा सर्वाधिक धोकादायक स्थळ आहे कारण ते सात फॉल्ट लाईनवर स्थित आहे.

जर ते सक्रिय झाले, तर उच्च तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. दिल्ली-एनसीआर हिमालयाजवळ असल्याने टेक्टोनिक प्लेट्समधील बदल येथे जाणवतात. हिमालयीन पट्ट्यातील कोणत्याही भूकंपाचा दिल्ली-एनसीआरवर परिणाम होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com