Turkey Earthquake: तुर्कीच्या भुगर्भात नेमकं चाललंय तरी काय? देश 10 फूट खचला...

मृत्यूसंख्या 7 हजारांवर; देशात 3 महिन्यांसाठी आणीबाणी घोषित
Turkey Earthquake
Turkey EarthquakeDainik Gomantak
Published on
Updated on

Turkey Earthquake: सोमवारचा दिवस तुर्कीसाठी आपत्ती घेऊन आला. पहाटे 4.17 वाजता भूकंपाच्या पहिल्या धक्क्याने अनेकांचा जीव घेतला. यानंतर सतत भूकंपाचे धक्के आणि आफ्टरशॉकने अनेक मोठी शहरांचे रूपांत आता ढिगाऱ्यात झाले आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा भूकंप इतका शक्तिशाली होता की त्याने तुर्की हा देश 10 फुट खचला आहे.

काय म्हणताहेत भूकंपशास्त्रज्ञ

इटलीचे भूकंपशास्त्रज्ञ डॉ. कार्लो डोग्लिओनी यांनी सांगितले की तुर्कीच्या टेक्टोनिक प्लेट्स सीरियाच्या तुलनेत पाच ते सहा मीटर पुढे जाऊ शकतात. खरं तर, तुर्की अनेक प्रमुख फॉल्टलाइनवर स्थित आहे, जे अनाटोलियन प्लेट, अरेबियन प्लेट आणि युरेशियन प्लेटशी जोडलेले आहेत, ज्यामुळे येथे भूकंपाचा धोका जास्त आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, अॅनाटोलियन प्लेट आणि अरेबियन प्लेटमधील 225 किलोमीटरची फॉल्टलाइन तुटली आहे.

Turkey Earthquake
Propose Day 2023: तुम्हाला प्रपोज डेला तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर पंचांगानुसार जाणून घ्या शुभ अन् अशुभ वेळ

सोमवारी पहाटे ४.१५ वाजल्यापासून आतापर्यंत तुर्कीमध्ये ५५० वेळा पृथ्वी हादरली आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत ७००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी देशातील दहा प्रांतांमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे.

13 फेब्रुवारीला शाळा बंद ठेवल्या आहेत. भारतासह 70 देशांनी तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे.

काय होत आहे तुर्कीच्या भूगर्भात ?

तुर्की चार टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनवर वसलेले आहे. म्हणूनच कोणत्याही प्लेटमध्ये थोडीशी हालचाल झाल्यास संपूर्ण परिसर हादरतो. तुर्कीचा बहुतेक भाग अनाटोलियन मायक्रोप्लेट्सवर आहे. या प्लेटच्या पूर्वेस डावीकडे अरेबियन प्लेट आहे. दक्षिण आणि नैऋत्येस आफ्रिकन प्लेट आहे. तर उत्तरेकडे युरेशियन प्लेट आहे.

तुर्कीच्या भुगर्भात अॅनाटोलियन मायक्रोप्लेट्स एजियन मायक्रोप्लेट्सकडे जात आहेत. दुसरीकडे, अरेबियन टेक्टोनिक प्लेट तुर्की प्लेटला दाबत आहे. तर युरेशियन प्लेट वेगळ्या दिशेला जात आहे. या प्लेट्सच्या हालचालींमुळे संपूर्ण पृथ्वी थरथरत आहे.

वास्तविक तुर्कीची टेक्टोनिक प्लेट दोन भागात विभागली गेली आहे. प्रथम ज्यावर इमारती बांधल्या जातात. दुसरा त्यापेक्षा खूप खाली आहे. तळाची प्लेट पूर्वी मागे होती. जी सतत दबावामुळे पुढे सरकत आहे.

एवढेच नाही तर खालची प्लेट सरकल्याने वरची जमीन दुभंगू शकते, मधोमध मोठी भेग पडू शकते किंवा संपूर्ण देशाचे दोन तुकडे होऊ शकतात. कारण मायक्रोप्लेट्स लहान आणि नाजूक असतात. अॅनाटोलियन मायक्रोप्लेट्स फार मजबूत नाहीत.

Turkey Earthquake
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरात किरकोळ घट; जाणून घ्या आजचे दर...

तुर्कस्तानच्या भुगर्भातील जमिन उलट्या दिशेने सरकत आहे

तुर्कीच्या भूगर्भातील मायक्रोप्लेट्स उलट दिशेने जात आहेत. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. अरेबियन प्लेट या छोट्या प्लेट्सला धक्का देत आहे.

फिरणाऱ्या अॅनाटोलियन प्लेटला जेव्हा अरेबियन प्लेट धक्का देते तेव्हा तेव्हा ती युरेशियन प्लेटवर आदळते. त्यामुळे दोनवेळा भूकंप होतो. प्रथम अरेबियन प्लेटच्या टक्करने आणि नंतर युरेशियन प्लेटच्या टक्करने.

टेक्टोनिक प्लेट्स काय आहेत ते जाणून घ्या

पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. इनर कोर, आऊटर कोअर, मँटल आणि क्रस्ट. सर्वात वर असतो तो क्रस्ट. मँटल आणि क्रस्ट मिळून लिथोस्फियर हा थऱ बनतो. लिथोस्फियरची जाडी 50 किलोमीटर आहे. लिथोस्फियर वेगवेगळ्या थरांनी बनलेला असतो. ज्यांना टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात.

भूकंप का होतात?

पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत फिरत राहतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात, घासतात, एकमेकांवर चढतात किंवा एकमेकांपासून दूर जातात तेव्हा जमिन थरथरते. याला भूकंप म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com