Lok Sabha Elections 2024: वोट फॉर काँग्रेस; दिल्लीत यासिन मलिकसोबत मनमोहन सिंग यांचे पोस्टर कोणी लावले?

Yasin Malik Poster With Former PM Manmohan Singh: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नव्या वादात सापडली आहे.
Yasin Malik Poster With Former PM Manmohan Singh
Yasin Malik Poster With Former PM Manmohan SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नव्या वादात सापडली आहे. दिल्लीत जम्मू-काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक (Yasin Malik) याच्यासोबत मनमोहन सिंग (Former Prime Minister Manmohan Singh) यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. दिल्लीतील भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही हे पोस्टर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केले असून, त्यानंतर काँग्रेस (Congress) पुन्हा एकदा भाजपच्या निशाण्यावर आली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हे पोस्टर हटवले.

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) हे पोस्टर मंडी हाऊस सर्कलजवळून हटवले आहे. या पोस्टरमध्ये यासीन मलिकसोबत मनमोहन सिंग दिसत असून यासीन मलिकच्या सुटकेच्या मागणीसह काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 25 तारखेला दिल्लीत मतदान होणार आहे. अशा पोस्टरमध्ये 25 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, हे पोस्टर्स कोणी लावले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Yasin Malik Poster With Former PM Manmohan Singh
Amit Shah Fake Video Case: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

दरम्यान, यासीन मलिक दहशतवादी फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याच्या नेतृत्वाखालील जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटवर 15 मार्च रोजी बंदी घालण्यात आली होती. याशिवाय, इतर काही गटांवरही बंदी घालण्यात आली होती. देशात यूपीए सरकार असताना यासिन मलिकने दिल्लीत मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. त्यावेळी, मनमोहन सिंग पंतप्रधान होते. पोस्टरमधील छायाचित्र या बैठकीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या पोस्टरचा व्हिडिओ शेअर करताना अमित मालवीय यांनी लिहिले की, दिल्लीभर काँग्रेसच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले आहेत. यासिन मलिकला 2022 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. यानंतर विशेष न्यायालयाने त्याला दहशतवादी फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Yasin Malik Poster With Former PM Manmohan Singh
Amit Shah Big Announcement: लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार, अमित शाह यांची मोठी घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी 2006 मध्ये यासिन मलिक यांची भेट घेतली होती. या बैठकीपूर्वी यासिन मलिक इतर काश्मीर नेते आणि संघटना यांच्याशी गोलमेज चर्चा झाली. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी यासिन मलिक याला पंतप्रधान निवासस्थानी बोलावले होते. या भेटीशी संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेव्हाही काँग्रेस निशाण्यावर आली होती. त्या छायाचित्रात मनमोहन सिंग यासिन मलिकसोबत हस्तांदोलन करताना दिसत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com