Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

Yashasvi Jaiswal Viral Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगत आहे.
Yashasvi Jaiswal Video
Yashasvi Jaiswal VideoDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगत आहे. मैदानावर दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करत असतानाच, मैदानाबाहेर भारतीय संघाच्या दोन युवा खेळाडूंच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल यांच्यातील एका मजेशीर प्रसंगामुळे चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

नेमकी घटना काय?

भारतीय संघ निर्णायक सामन्यासाठी हॉटेलवरून स्टेडियमकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत होता. यावेळी यशस्वी जयस्वाल पुढे चालत होता आणि ध्रुव जुरेल त्याच्या अगदी मागे होता. बसमध्ये चढत असताना ध्रुवने यशस्वीला मागून काहीतरी खोडसाळपणे चिडवले किंवा स्पर्श केला. ध्रुवच्या या अनपेक्षित हरकतीमुळे यशस्वी चकित झाला आणि त्याने मजेशीर अंदाजात ध्रुवकडे पाहून हात उगारला. यशस्वीने त्याला जणू 'थप्पड' मारण्याचा इशाराच केला, मात्र हा सर्व प्रकार केवळ थट्टा-मस्करीचा होता.

Yashasvi Jaiswal Video
Goa Ranji Cricket: गोवा क्रिकेटसाठी महत्वाची बातमी! 'हा' धाकड खेळाडू परतला रणजी संघात, चौघांना वगळले; वाचा संपूर्ण यादी..

व्हायरल व्हिडिओ

यशस्वीने हात उगारताच ध्रुव जुरेलनेही हसून त्याला दाद दिली. व्हिडिओमध्ये दोघेही खेळाडू बसमध्ये चढताना हसताना आणि एकमेकांशी मस्करी करताना स्पष्ट दिसत आहेत. जरी जयस्वालचा हात उगारलेला पाहून सुरुवातीला चाहत्यांना काहीतरी वाद झाल्याचे वाटले, तरी प्रत्यक्षात या दोन्ही युवा खेळाडूंमधील मैत्रीचा हा एक हलका-फुलका क्षण होता. राजस्थान रॉयल्ससाठी सोबत खेळणाऱ्या या जोडीमध्ये मैदानात आणि मैदानाबाहेरही घट्ट मैत्री असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Yashasvi Jaiswal Video
Goa Crime: आधी प्रेम, मग अनन्वित अत्याचार अन् शेवटी गळा चिरला, रशियन सिरीयल किलरच्या क्रूरतेनं हादरला गोवा; लवकरच उलघडणार 10 तरुणींच्या मृत्यूचं गूढ?

दोघांनाही प्लेइंग-११ मध्ये संधीची प्रतीक्षा

दरम्यान, या मालिकेत दोन्ही खेळाडू बेंचवरच आहेत. ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाल्याने ध्रुव जुरेलला तातडीने संघात पाचारण करण्यात आले, मात्र त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही.

दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल हा सातत्याने संघाचा भाग असला तरी, सलामीच्या जोडीत शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्या उपस्थितीमुळे त्यालाही या एकदिवसीय मालिकेत संधी मिळालेली नाही. इंदूरच्या निर्णायक सामन्यातही कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण या दोन्ही खेळाडूंना अंतिम ११ मध्ये स्थान मिळालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com