'हॉटेलमध्ये बोलावून माझं लैंगिक शोषण...', RCB च्या स्टार खेळाडूचे पाय पुन्हा खोलात; आणखी एका तरूणीकडून गंभीर आरोप, FIR दाखल

Yash Dayal: जयपूरमधील सांगानेर पोलिस ठाण्यात यश दयालविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
Yash Dayal
Yash DayalDainik Gomantak
Published on
Updated on

जयपूर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज यश दयाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. समोर आलेल्या आणखी एका प्रकरणात आता जयपूरमधील सांगानेर पोलिस ठाण्यात यश दयालविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

जयपूरमधील एका मुलीने आरोप केला आहे की यश दयालने तिला क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे आमिष दाखवले आणि भावनिक ब्लॅकमेल करून दोन वर्षे तिचे लैंगिक शोषण केले. मुलीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी क्रिकेटपटूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Yash Dayal
Goa Police: 'गोवा पोलिस सर्वात खराब, कोलवा बीचवर मला भीती दाखवून 2,000 लाच घेतली'; पोलिसांवर गंभीर आरोप

यश दयालवर लैंगिक शोषणाचा आरोप होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका मुलीने यशवर लग्नाच्या बहाण्याने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तथापि, त्या प्रकरणात यश दयालला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटमुळे पीडित मुलगी आणि यश दयाल यांच्यात संपर्क आला होता. मुलीने आरोप केला आहे की, सुमारे दोन वर्षांपूर्वी ती अल्पवयीन असताना दयालने क्रिकेटमध्ये करिअर करण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. यश दयाल आयपीएल २०२५ सामना खेळण्यासाठी जयपूरला पोहोचला असतानाही त्याने मुलीला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचे वृत्त आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावनिक ब्लॅकमेल आणि सततच्या शोषणामुळे पीडितेने अखेर तक्रार दाखल केली. पहिल्यांदा बलात्कार झाला तेव्हा मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी दयालविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

Yash Dayal
Goa Tourism: 'गोव्यात पर्यटन भरभराटीला येत आहे'! खंवटेंनी सादर केली आकडेवारी; देशांतर्गत 39.48% वाढ

जयपूरमधील या घटनेपूर्वी, गाझियाबादमधील मुलीनेही यश दयालवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. पीडितेने सोशल मीडियावर पोस्ट करून क्रिकेटपटूविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलिसांकडे न्यायासाठी आवाहन केले होते. इतकेच नाही तर, पीडितेने यश दयालसोबतचा तिचा फोटोही शेअर केला होता.

गाझियाबादमधील पीडितेने दावा केला होता की ती पाच वर्षांपासून यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. यशने लग्नाचे आश्वासन देऊन तिचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले. यश दयालने मुलीची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली होती, परंतु तो लग्न पुढे ढकलत राहिला. एका टप्प्यावर, पीडितेला क्रिकेटपटू तिची फसवणूक करत असल्याचा संशय आला आणि तिने विरोध करण्यास सुरुवात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com