मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचे वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग

हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर योगी आदित्यनाथ वाराणसीतील सर्किट हाऊसमध्ये काही काळ थांबले.
Helicopter
Helicopter Dainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचे वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हेलिकॉप्टर पक्ष्याला धडकल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित आहेत.

Helicopter
By-polls result : लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकींचे निकाल आज होणार जाहीर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता राज्याच्या विमानातून लखनऊला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी वाराणसीहून लखनऊला उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच त्यांचे हेलिकॉप्टर पक्ष्याला धडकले. यानंतर हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांनी सीएम योगींच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लॅंडींग केली. हेलिकॉप्टर पक्ष्याला आदळल्यानंतर अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टर उतरवण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर योगी आदित्यनाथ वाराणसीतील सर्किट हाऊसमध्ये काही काळ थांबले. सीएम योगी आता स्टेट प्लेनने लखनऊला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ लखनऊमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com