Goa Beach Problems: 'किनारी भागात हप्ते हजारांऐवजी द्यावे लागतात लाखांमध्ये'! पालेकरांचा आरोप; 'राजकीय बॉस' शोधण्याची केली मागणी

Amit Palekar: पालेकर म्हणाले, रेस्टॉरंट, शॅक, हॉटेल व बार मालकांनी आपणास धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले आम्ही यापूर्वी काही हजारांत रक्कम देत होतो.
pravin arlekar babu ajgaonkar
AAP Leader Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चार महिन्यांपूर्वी काही हजारांत द्याव्या लागणाऱ्या हप्त्यांत आता वाढ होऊन ती रक्कम तीन ते चार लाखांपर्यंत पोहोचल्याची तक्रार घेऊन किनारी भागातील बार, शॅक, रेस्टॉरंट मालकांनी आपली भेट घेतली. आपल्याकडे त्यांनी हप्त्यासंबंधी समस्या मांडल्या, अशी माहिती ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी दिली.

पालेकर म्हणाले, रेस्टॉरंट, शॅक, हॉटेल व बार मालकांनी आपणास धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले आम्ही यापूर्वी काही हजारांत रक्कम देत होतो, आता ही रक्कम तीन ते चार लाखांवर पोहोचली आहे. काही राजकारण्यांची नावे घेऊन हप्ते गोळा केले जात आहेत, असेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, अगोदरच पर्यटन व्यवसायाचे बारा वाजले आहेत, पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झालेले आहे. असे असताना व्यावसायिकांकडून लाखो रुपयांचे हप्ते गोळा केले जात आहेत.

हे व्यावसायिक आपणास वकील म्हणून भेटले, परंतु एक राजकारणी म्हणून हे सर्व प्रकरण उजेडात आणण्याची आपली जबाबदारी आहे. या प्रकरणात किनारी भागातील आमदारांची नावेही घेतली जात आहेत,असा आरोपही त्यांनी केला.

pravin arlekar babu ajgaonkar
Goa Tourism: गोव्याचे किनारे 'दलालमुक्त' होणार! पर्यटनमंत्री खंवटेंचा निर्धार; हंगामाच्या प्रारंभी पर्यटक वाढल्याचा दावा

ते पुढे म्हणाले, ज्याप्रमाणात किनारी भागात दलाली आणि वेश्याव्यवसाय सुरू आहे, तो बंद झाला पाहिजे. जे हप्ते गोळा करतात, त्यांना राजकीय बॉस आहे हे पोलिसांनी तपासायला हवे. हजारो रेस्टॉरंट आणि बार कांदोळी व कळंगुट भागात आहेत, त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल करतात, हे धक्कादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. इतर राज्यातील पर्यटक गोवा सोडून इतर देशांत जाण्यास पसंती देत आहेत, हे दिसले आहे, त्यामुळे पर्यटन वाचवणे आवश्यक आहे.

pravin arlekar babu ajgaonkar
Konkan Tourism: निसर्गरम्यता आणि ऐतिहासिक वारसा... जांभ्या दगडात विना-चुना बांधलेला बळकट 'रामगड'

मुख्यमंत्री, पर्यटन मंत्र्यांनी लक्ष घालावे!

हॉटेल, रेस्टॉरंट व बार वाल्यांना लागणारे सात ते आठ परवाने घेण्यासाठी प्रत्येक खात्याकडून तो मिळविताना संबंधितांना काय तोंड द्यावे लागते, हे न सांगण्यारखे आहे. एकदा परवाना घेतला तरी व्यवसाय सुरू होईलच, असे नाही. त्यासाठी त्यांना अशाप्रकारे हप्ते द्यावे लागतात, त्यामुळे लाखो रुपये गुंतवूनही स्थानिक व्यावसायिकांना अशाप्रकारे समस्येला सामोरे जावे लागणे अत्यंत निंदनीय आहे. ‘सीसीटीव्ही’द्वारे तपासल्यास कोण पैसे घेतो, ते पोलिसांना सहजरित्या सापडू शकते. मुख्यमंत्री व पर्यटन मंत्र्यांनी याप्रकरणात लक्ष घालावे आणि पोलिसांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी, अशी मागणी पालेकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com