राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी नव्या मंत्र्यांची बैठक,अधिवेशनाची तयारी

राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा(Amit Shah), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) आणि अनेक दिग्गज मंत्री सहभागी होते.
Meeting of Modi's new ministers Preparations for winter session
Meeting of Modi's new ministers Preparations for winter sessionDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतर(Cabinet Expansion) काल पहिल्यांदाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांच्या निवासस्थानी 29 मंत्र्यांची बैठक(Cabinet Meeting) पार पडली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात(Monsoon Session) सरकारच्या कामकाजासंदर्भात ही बैठक बोलविण्यात आली असून सरकारचा प्रयत्न असा आहे की या अधिवेशनात सर्व राज्यमंत्र्यांनी संसदेत त्यांच्या मंत्रालये आणि विभागांशी संबंधित विचारलेल्या तोंडी प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची, यावर राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी चर्चा झाली असल्याची समजत आहे.

राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा(Amit Shah), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) आणि अनेक दिग्गज मंत्री सहभागी होते. कोरोना कालावधी, घसरणारी अर्थव्यवस्था आणि लसच्या संथ गतीबाबत केंद्र सरकारवर विरोधक आधीच संतप्त आहेत.याचाच आढावा घेत आपल्या मंत्र्यांनी आपल्या आपल्या खात्यांची संपूर्ण माहिती घेऊन विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार राहण्यास या बैठकीत मंत्र्यांना सांगण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

Meeting of Modi's new ministers Preparations for winter session
संसदेच्या पावसाळी आधिवेशनाला 19 जुलैपासून सुरुवात

संसदेचे हिवाळी अधिवेशन 19 जुलै पासून सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार बरीच बिलेही पास करण्याची तयारी करत आहे. त्याचबरोबर महागाई, कोरोनाची वाढती साथ आणि विकासाशी संबंधित विषयांवर सरकारला घेराव घालणे हे विरोधकांचे लक्ष्य आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या मंत्र्यांना भाजप तयार करत आहे.

19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होईल. संसदेचे हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार असून संसदेच्या या अधिवेशनात केंद्र सरकार 23 नवीन बिले मंजूर करण्याची तयारी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अधिवेशनात 3 अध्यादेश आणि 17 नवीन बिले सादर केली जातील.आणि ते पारित करण्याचाही सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Meeting of Modi's new ministers Preparations for winter session
प्रशांत किशोर आणि राहुल गांधींची भेट; तिसरी आघाडी की मिशन पंजाब?

केंद्र सरकार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट बिल, सेंट्रल युनिव्हर्सिटी बिल, मर्यादित देयता भागीदारी विधेयक, कंटेनमेंट बिल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी यासांरखी बिले सरकार या अधिवेशनात मांडून ती बिले मंजूर करण्याच्या तयारीत आहे . याच सगळ्या पार्शवभूमीवर राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत आपल्या सर्व मंत्र्यांना कानमंत्र दिले असल्याचे समजत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com