Plane Crash Reason: टेकऑफनंतर या 'दोन' कारणांमुळे लगेच होऊ शकतो विमानाचा अपघात

Air India Plane Crash: अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमान अपघाताचे कारण फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधून समोर येऊ सकते असे या विषयातील तज्ञ सांगतात.
Reasons Of Plane Crash
Air India Plane Crashed In AhmedabadDainik Gomantak
Published on
Updated on

गुजरात: अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा टेकऑफनंतर पाचच मिनिटांत भीषण अपघात झाला. विमानात २४२ प्रवासी प्रवास करत होते, या सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात २ पायलट आणि १० केबिन क्रू यांचा समावेश आहे. विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हा अपघात कशामुळे झाला असेल याबाबत तज्ञ विविध कारणे सांगत आहेत.

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या झालेल्या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अपघातानंतर विमानाचा भीषण स्फोट झाला तसेच, टेकऑफनंतर पाच मिनिटातच विमान इमारतीवर कोसळले त्यामुळे विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान, या अपघाताचे कारण फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधून समोर येऊ सकते असे या विषयातील तज्ञ सांगतात. विमान अपघातासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरु शकतात, असे काही तज्ञ सांगतात.

Reasons Of Plane Crash
Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण काय? अहमदाबादमधील दुर्घटनेबाबत चौकशी सुरु

लोड फॅक्टर

विमान अपघातात लोड फॅक्टर एक महत्त्वाचे कारण असू शकते. लोड फॅक्टरची चुकीची गणना अपघाताचे कारण ठरु शकते. लोड फॅक्टर हा विमानात ठेवलेल्या वजनाचे गुणोत्तर असते. विमानाच्या रचनेनुसार लोड फॅक्टर ठरवला जातो. दाब नियंत्रित करण्यासाठी प्रवाशांची बैठक निश्चित केली जाते.

लँडिंग गिअर

अपघाताचे दुसरे कारण म्हणजे विमानचे लँडिंग गिअर व्यवस्थित बंद न होणे. लँडिंग गिअर विमानात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. विमानाचे संपूर्ण वजन हाताळण्यासाठी तसेच, टेक-ऑफ आणि लँडिंग दरम्यान धावपट्टीच्या संपर्कात आल्यावर गतिज ऊर्जा शोषून घेण्यासाठी त्याचे डिझाइन करण्यात आलेले असते. येथूनच विमानाची चाके बाहेर येतात.

Reasons Of Plane Crash
Air India plane crash: 242 प्रवासी दगावल्याची भीती! एअर इंडिया विमान अपघाताचे फोटो, व्हिडिओ पाहा

अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण अद्याप समोर आले नसले तरी, विमानाचे एक चाक इमारतीत अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विमान वजनाच्या चुकीच्या मोजणीमुळे असे होऊ शकते. पण, विमानाचे उड्डाण करण्यापूर्वी अशी सर्व माहिती तपासली जाते, असे तज्ञ सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com