बाबूल सुप्रियोंनी का ठोकला राजकारणाला रामराम?

‘बाबूल मोरा, नैहर छूटो जाय’.....या भैरवीतील व्यथांना शब्दरूप देत, चित्रपट पार्श्वगायनाकडून राजकारणात आले होते बाबूल सुप्रियो.
बाबूल सुप्रियो
बाबूल सुप्रियोDainik Gomantak

नवी दिल्ली: ‘बाबूल मोरा, नैहर छूटो जाय’.....या भैरवीतील व्यथांना शब्दरूप देत, चित्रपट पार्श्वगायनाकडून राजकारणात (Politics) आलेले माजी केंद्रीयमंत्री व भाजप खासदार बाबूल सुप्रियो (Babul Supriy) यांनी आज नाट्यमयरीत्या राजकारणातून संन्यास (retire) घेण्याची घोषणा केली. (Why did Babul Supriyo retire from politics)

पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून सलग दोनदा खासदार झालेल्या सुप्रियो यांनी खासदारकीही सोडण्याचा निर्धार केला आहे. दिल्लीतील राहता बंगला आपण महिनाभराच्या आत सोडू असे त्यांनी जाहीर केले. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सुप्रियो यांना वगळण्यात आल्याने ते व्यथित झाले होते. फेसबुकवर आज एक भावनिक पोस्ट लिहून त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.आपण तृणमूल कॉंग्रेस, कॉंग्रेस, डावे पक्ष यापैकी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान राजकारण सोडण्याचा आपला विचार आपण अमित शहा व जे. पी. नड्डा यांच्या कानावरही घातला आहे. या दोघांचे प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. असे सुप्रियो यांनी म्हटले.

बाबूल सुप्रियो
जावायाचा हायव्होल्टेज ड्रामा; गावभर झाला हंगामा

का ठोकला राजकारणाला रामराम?

लोकसभा खासदार म्हणून 2014 मध्ये संसदेत पोहोचलेले बाबुल सुप्रियो यांनी आतापर्यंत अनेक मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे.

पण पश्चिम बंगालची निवडणूक पन्नास हजार मतांनी हरल्यानंतर, या महिन्याच्या सुरुवातीला, मंत्रीपदही त्याच्या हातातून हरवले.

बाबुल सुप्रियो यांनी मंत्रीपद गमावण्याला राजकारण सोडण्याचे एक कारण मानले आहे.

त्यांनी लिहिले आहे की "जर कोणी विचारले की मंत्रीपद गमावणे हे राजकारण सोडण्याशी संबंधित आहे का, तर हे काही प्रमाणात खरे आहे. पण निवडणुका सुरू होण्यापूर्वीच माझे राज्य प्रभारींशी मतभेद होते."

बाबूल सुप्रियो
Breaking: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com