Video: मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच Congress कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी

Election Results: सध्या देशातील 15 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. 2024 मध्ये सात राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.
Assembly Election Results 2023
Assembly Election Results 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Firecrackers are set off outside the Congress Delhi office before the counting of votes begins:

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये आज सकाळी ८ वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

दरम्यान मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच दिल्लीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत ढोल ताशांसह फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषाला सुरुवात केली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीने ही चार राज्यांतील विधानसभा निवडणूक भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे.

सध्या देशातील 15 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. 2024 मध्ये सात राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.

यामध्ये सिक्कीम, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड यांचा समावेश आहे.

सध्या हरियाणा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. ओडिशात बीजेडीची सत्ता आहे, तर आंध्र प्रदेशात वायएसआरसीपीची सत्ता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com