Bihar Politics: बिहारमधील महाआघाडीच्या नव्या सरकारचा उद्या दुपारी 4 वाजता शपथविधी होणार आहे. नितीश कुमार यांच्यासह तेजस्वी यादव आणि महाआघाडीच्या नेत्यांनी बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. राज्यपालांना सादर केलेल्या पत्रात 164 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात सात पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे.
दरम्यान, नितीश कुमार (Nitish Kumar) आणि तेजस्वी यादव यांनी सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. संयुक्त चर्चेत नितीश कुमार म्हणाले, "मी इथे राज्यपालांना भेटण्यासाठी आलो. बिहारची सेवा करणे हा आमचा अजेंडा आहे. आम्हाला सात पक्षांचा पाठिंबा आहे. यात डावे आणि जीतनराम मांझी यांच्या पक्षाचाही समावेश आहे." नितीशकुमार यांनी आरसीपी सिंह यांचे नाव न घेता भाजपवर निशाणा साधला.
तेजस्वी यादव म्हणाले, "भाजपला (BJP) कोणताही मित्रपक्ष नाही. भाजप ज्या पक्षांशी जुळवून घेतो त्यांनाच संपवतो. पंजाब (Punjab) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) जे घडले ते आम्ही पाहिले. बिहारमध्ये जे काही घडत आहे, ते कोणापासून लपून राहिलेले नाही. लोकांना पर्याय हवा आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळाला नाही. नितीश कुमार यांनी सातत्याने ही मागणी लावून धरली मात्र त्यांची ही मागणी मान्य झाली नाही. सर्व पक्ष आणि सदस्यांनी नितीशकुमार यांना आपला नेता म्हणून स्वीकारले आहे.''
नितीशकुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का?
या प्रश्नाला उत्तर देताना आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, 'सध्या नितीश कुमार हे देशातील सर्वात अनुभवी मुख्यमंत्री आहेत. देशाचे संविधान वाचवायचे आहे.' देशातील वातावरण बिघडवले जात असल्याचा आरोपही तेजस्वी यांनी भाजपवर केला. नितीशकुमार यांनी निर्भयपणे निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये भाजपचा अजेंडा राबवू द्यायचा नाही. तेजस्वी यादव म्हणाले पुढे की, 'यात आपला फायदा नसून बिहारच्या जनतेसाठी पावले उचलली आहेत.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.