Nitish Kumar Resigns: नितीश कुमार यांनी CM पदाचा दिला राजीनामा

Bihar Political Crisis: जेडीयू नेते नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची राजभवनात भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द केला.
Nitish Kumar
Nitish KumarDainik Gomantak

Nitish Kumar Resigns: बिहारमध्ये सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. जेडीयू नेते नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची राजभवनात भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांमध्ये आपण एनडीएमधून बाहेर पडावे यावर एकमत झाले आहे.

तत्पूर्वी नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी जेडीयूचे खासदार, आमदार आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, 'भाजपने (BJP) जेडीयूला संपवण्याचे षडयंत्र रचले होते. 2020 पासून त्यांनी जेडीयूला संपवण्याची मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती.' चिराग पासवान यांचे नाव न घेता ते असेच एक उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. आताच सावध न राहिल्यास पक्षाचे भले होणार नाही, असेही नितीश म्हणाले.

Nitish Kumar
Nitish Kumar घेणार भाजपपासून काडीमोड? राज्यपालांना मागितली भेटीची वेळ

जेडीयूच्या सर्व नेत्यांनी नितीशकुमारांना पाठिंबा दिला

जेडीयूच्या बैठकीत पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांनी नितीश कुमार यांच्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांनी नितीश कुमार यांच्या पाठिशी असल्याचे देखील म्हटले आहे. ते जो काही निर्णय घेतील त्यास आमचा पाठिंबा असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Nitish Kumar
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत पुन्हा ढिसाळपणा, सभेच्या ठिकाणी बॉम्ब स्फोट

भाजप नेत्यांचीही बैठक झाली

त्याचवेळी, भाजपने उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्या निवासस्थानी आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आहे. बिहार सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते शाहनवाज हुसेन म्हणाले की, 'आम्ही आमचा पक्ष मजबूत करतो, आम्ही इतर कोणत्याही पक्षाला कमकुवत करत नाही. मी पाटण्याला जात आहे. याबाबत पक्षनेतृत्व अधिकृत निवेदन देणार आहे. आम्ही बिहारच्या (Bihar) लोकांसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com