COVID-19: केरळ तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर

ज्यात नियंत्रणात आलेली कोरोना (Corona Virus) रुग्णांची रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. हे पाहता, आरोग्य तज्ञांनी केरळमध्ये कोरोना(COVID-19) महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.
COVID-19: Kerala reeling under the threat of third wave aap92
COVID-19: Kerala reeling under the threat of third wave aap92Dainik Gomantak
Published on
Updated on

केरळमध्ये(Kerala) पुन्हा एकदा कोरोनाने(COVID-19) डोके वर काढायला सुरूवात केली आहे. राज्यात नियंत्रणात आलेली कोरोना (Corona Virus) रुग्णांची रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. हे पाहता, आरोग्य तज्ञांनी केरळमध्ये कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. मात्र,आणखीनही राज्याने तिसऱ्या लाटेची औपचारिक घोषणा केलेली नाही.(COVID-19: Kerala reeling under the threat of third wave aap92)

जूनच्या चौथ्या आठवड्यात दररोज 12 ते 14 हजार कोविड रुग्ण केरळमध्ये आढळत होते. त्या तुलनेत जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दररोज 20 ते 22 हजार रुग्णांची नोंदणी झाली असल्याने ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. तसेच पॉजिटिव्हिटी दरही वाढून गेल्या सहा दिवसात 12% पेक्षा जास्त गेला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनीही मंगळवारी सांगितले की, देशात असे 44 जिल्हे आहेत ज्यात 10% पेक्षा अधिक सकारात्मकता दर आहे. हे जिल्हे केरळ, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमध्ये आहेत.

रुग्णांच्या संख्येत वाढ ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, म्हणून आता काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात अशा लोकांची संख्या अजूनही खूप जास्त आहे, ज्यांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे नवीन कोविड लाटेला सामोरे जाण्यासाठी सरकारने दूरगामी धोरण आखण्याची गरज असल्याचे आरोग्य तज्ञ डॉ रमन कुट्टी यांनी सांगितले आहे.

COVID-19: Kerala reeling under the threat of third wave aap92
COVID-19 ची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही: केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नियमानुसार कुठलाही विषाणू रोग हा वेगवेळ्या लाटांमध्ये येत असतो. जेव्हा लोकसंख्या रोगांना अधिक संवेदनशील असते. केरळमधील कोरोनाची प्रकरणे खाली येण्यापूर्वी अजून अनेक लाटा येणे बाकी असल्याचेही तद्यांकडून वारंवार सांगितले जात आहे.

तसेच यावेळी बोलताना आयएमएचे राजीव जयदेवन यांनी "अगदी सुरुवातीपासूनच कोरोना देशाच्या इतर भागांपासून केरळमध्ये वेगळ्या पद्धतीने पसरला आहे. लहान देशांच्या तुलनेत मोठ्या देशांमध्ये रोगाच्या लाटा समान रीतीने पसरत नाहीत. लोकसंख्या घनता, भूगोल, सामाजिक-आर्थिक परिस्थिती, शिक्षण यासारख्या अनेक घटकांवर हे अवलंबून आहे." असे मत व्यक्त केले आहे.

लसीकरण वाढल्यावर आपण व्हायरस पूर्णपणे नष्ट करू शकणार नाही, परंतु याद्वारे आपण भविष्यात होणारे नुकसान कमी करू शकतो. असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com