EDची मोठी कारवाई, देशातील बड्या उद्योजकाला बेड्या

EDने बँक निधीचा गैरव्यवहार, संबंधित लोकांशी आणि कंपन्यांशी फसवणुकीचे व्यवहार, बँकांकडून चुकीचे कर्ज घेणे, बनावट व्हाउचर आणि आर्थिक तपशील देणे, गुन्हेगारी षड्यंत्र आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे.
ED  arrested Avantha Group promoter Gautam Thapar in a money laundering case.
ED arrested Avantha Group promoter Gautam Thapar in a money laundering case. Dainik Gomantak
Published on
Updated on

ईडीने(Enforcement Directorate) मंगळवारी मनी लाँडरिंग प्रकरणात(Money Laundering Case) उद्योजक आणि अवंथा समूहाचे(Avantha Group) प्रवर्तक गौतम थापर(Gautam Thapar) यांना अटक केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी तपास यंत्रणेने(ED) अलीकडेच दिल्ली आणि मुंबईतील अवंता ग्रुप आणि अवंता ग्रुपच्या गौतम थापर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकले होते. यानंतर थापर यांचीही चौकशी करण्यात आली होती.(ED arrested Avantha Group promoter Gautam Thapar in a money laundering case.)

गौतम थापर यांच्यावर बँक निधीचा गैरव्यवहार, संबंधित लोकांशी आणि कंपन्यांशी फसवणुकीचे व्यवहार, बँकांकडून चुकीचे कर्ज घेणे, बनावट व्हाउचर आणि आर्थिक तपशील देणे, गुन्हेगारी षड्यंत्र आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणा या प्रकरणांमध्ये थापर यांची चौकशी करत आहे. थापर यांच्यावरील हे आरोप फॉरेन्सिक ऑडिट अहवालावर आधारित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने गौतम थापर आणि त्याच्या फर्म आणि सहयोगींविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. ज्यामध्ये येस बँकेमध्ये 467 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरणही आहे. येस बँकेचे माजी कार्यकारी संचालक राणा कपूर यांनी बाजारपेठेपेक्षा खूप कमी किंमतीत मालमत्तेच्या स्वरूपात अवंता रिॲलिटीकडून लाच घेतली होती असेही तपस यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. राणा कपूर यांनी ही लाच घेतली म्हणजे जेणेकरून थापर यांच्या कंपनीला येस बँकेकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी वेळ मिळू शकेल. या मालमत्तेचे बाजार मूल्य 685 कोटी रुपये इतके आहे.

ED  arrested Avantha Group promoter Gautam Thapar in a money laundering case.
India Delta Ranking: मणिपूरचा चंदेल मागास जिल्ह्यांच्या यादीत अव्वल

तर दुसरीकडे एसबीआयच्या तक्रारीवरूनगौतम थापर यांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसबीआयच्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने सीजी पॉवर आणि इंडस्ट्रियल सोल्यूशन लिमिटेड, त्याचे व्यवस्थापकीय संचालक गौतम थापर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात 2435 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com