अखेर पंतप्रधान मोदींनी ममतांच्या मनातील गोष्ट ऐकली

तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यावरच ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता
 
West Bengal CM Mamata Banerjee met Prime Minister Narendra Modi in Delhi today
West Bengal CM Mamata Banerjee met Prime Minister Narendra Modi in Delhi todayDAinik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री(West Bengal Chief Minister) ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांनी दिल्ली(Delhi) वारी केली आहे. आपल्या भेटी दरम्यान ममता बॅनर्जी यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत,त्यासोबतच ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी(Prime Narendra Modi) यांच्या भेटीला देखील पोहोचल्या होत्या. पंतप्रधानाच्या आणि ममतांच्या या भेटीकडे सर्व देशाचे लक्ष लागून होते कारण पश्चिम बंगालमध्ये भाजपने सर्वस्व पणाला लावून सुद्धा ममतांनी भाजपचा दारून पराभव केला होता. मात्र ही भेट केवळ नियोजित दौरा होता. (Mamata Banerjee In Delhi)

तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यावरच त्यांनी पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता, पंतप्रधान कालिकुंडाला गेले. आम्ही व्यक्तिशः भेटलो नाही.ही आमची शासकीय भेट होती. त्याचबरोबर ममता बॅनर्जी म्हणाल्या की आम्हाला राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लस कमी मिळाली असून पंतप्रधानांकडून उत्तर मिळालं की आम्ही नक्की पाहू. पंतप्रधानांशी झालेल्या मॅरेथॉन भेटीबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या की या दरम्यान राज्याचे नाव बदलण्याबाबतही चर्चा झाली आहे. तसेच बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांनी बंगालमधील निवडणुकांबाबत पंतप्रधानांशी कोणतीही चर्चा केली नाही. तिसऱ्यांदा सरकार स्थापल्यानंतर पंतप्रधानांशी आमची ही सौजन्य बैठक होती.

बंगाल विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आता राष्ट्रीय राजकारणातही त्यांचे पाय मजबूत करण्यास सुरूवात केली असल्याचे या दिल्ली दौर्यानंतर बोलले जात आहे. केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी मोर्चा एकत्र करण्यासाठी संबंधात ममतांनी दिल्ली गाठली असून विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र करण्याचा विचार त्या करीत आहेत . पंतप्रधान मोदींच्या भेटीव्यतिरिक्त ममता कॉंग्रेस नेत्यांनाही भेटणार आहेत.

त्यासोबतच ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचीही भेट घेतली आहे. या बरोबरच पश्चिम बंगालच्या विजयात ज्यांचा मोलाचा वाटा मानला जातो ते प्रशांत किशोर यांचीही ममतांसोबतदिल्लीत भेट झाली आहे. विशेष म्हणजे प्रशांत किशोर हे मागच्या बऱ्याच दिवसांपासून दिल्लीत अनेक नेत्यांना भेटलं आहेत. त्यांनी शरद पवार, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली होती.

 
West Bengal CM Mamata Banerjee met Prime Minister Narendra Modi in Delhi today
'लखनऊचीही दिल्ली करु';शेतकऱ्यांचे योगींना आव्हान

ममता बॅनर्जी उद्या सोनिया गांधी यांना त्यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार यांच्यासमवेत त्यांची बैठकदेखील प्रस्तावित आहे मात्र या भेटीची सध्या वेळ आणि दिवस निश्चित नाही. ममता बॅनर्जी त्यांच्या निवासस्थानीच विरोधी पक्षातील बड्या नेत्यांची भेट घेणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाला भेट देण्यासाठी येतील. ममतांच्या या नेत्यांशी झालेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ममता बॅनर्जी पाच दिवसांच्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू असताना ममता बॅनर्जी यांची दिल्ली भेट असल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com