'लखनऊचीही दिल्ली करु';शेतकऱ्यांचे योगींना आव्हान

Farmers Protest: सोमवारी भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश तिकट यांनी 5 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला चारही बाजूंनी घेराव घालण्याची घोषणा केली.
BKU leader Rakesh Tikait
BKU leader Rakesh TikaitDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारच्या (Central Government) तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या आठ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. सोमवारी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश तिकट यांनी 5 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला चारही बाजूंनी घेराव घालण्याची घोषणा केली. लखनौमध्ये पत्रकार परिषदेत संबोधित करतांना टीकैत म्हणाले की,'लखनऊची दिल्ली होईल.' यावेळी योगेंद्र यादव, शिवकुमार कक्का हे नेते देखील उपस्थित होते. (Rakesh Tikait has challenged Chief Minister Yogi Adityanath)

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर चळवळीला वेगवेगळ्या राज्यांत घेऊन जाण्यासाठी 'मिशन यूपी आणि उत्तराखंड' जाहीर केले.

यावेळी बोलताना योगेंद्र यादव म्हणाले की, आम्ही मिशन यूपी आणि उत्तराखंड सुरू करणार आहोत. यामुळे चळवळ अधिक केंद्रित आणि तीव्र होईल. यामध्ये मोठ्या मोर्चांचा आणि महापंचायतींचा समावेश असेल. भाजप आणि भाजप सरकारच्या धोरणांविरोधात निषेध गावपातळीपासून सुरू होईल आणि पुढे तो सर्वत्र पोहोचेल.

BKU leader Rakesh Tikait
Karnataka: नव्या मुखमंत्र्यांचा उद्या शपथविधी

शेतकरी नेते टिकैत यांनी यावेळी "तीन शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी आणि किमान आधार किंमतीची (MSP) कायदेशीर हमी मिळावी या मागणीसाठी सुरु केलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला आठ महिने पूर्ण झाले आहे. या आठ महिन्यांत, शेतकर्‍यांच्या स्वाभिमान आणि ऐक्याचे प्रतीक बनलेली ही चळवळ आता लोकशाही वाचविण्यासाठी आणि देशाला वाचवण्याची चळवळ बनली आहे, केवळ शेतकरीच नाही तर देशातील सर्व घटक या आंदोलनात सहभागी आहे असे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com