Shahid Afridi: खेळात राजकारण आणलं तर तुम्ही पुढे कसे जाल? आफ्रीदी पुन्हा बरळला, भारत-पाक सामना रद्द झाल्याचा राग अनावर

World Championship of Legends 2025: वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग (WCL २०२५) मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी संतप्त झाला आहे.
World Championship of Legends 2025
World Championship of Legends 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग (WCL) २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी संतप्त झाला आहे. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळेच हा सामना रद्द करण्यात आला, अशी चर्चा रंगली आहे.

भारतीय संघातील हरभजन सिंग, इरफान पठाण, युवराज सिंग, शिखर धवन, सुरेश रैना आणि युसुफ पठाण यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला, अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे संघातल्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत प्लेइंग इलेव्हनच तयार होऊ शकली नाही आणि आयोजकांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

World Championship of Legends 2025
Goa Assembly: 4119 प्रश्‍न, सरकारी आणि खासगी विधेयके; पावसाळी अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

या घटनेनंतर शाहिद आफ्रिदीने आपला राग व्यक्त करत भारतीय खेळाडूंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तो म्हणाला, “आम्ही इथे क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. जर भारताला आमच्याविरुद्ध खेळायचं नव्हतं, तर त्यांनी आधीच स्पष्ट करायला हवं होतं. सराव करून शेवटच्या क्षणी माघार घेणं हे क्रिकेटच्या आत्म्याला धरून नाही. क्रिकेट राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे.”

मात्र, सामना रद्द होण्यामागे आफ्रिदीच कारणीभूत असल्याचं काही माध्यमांचं म्हणणं आहे. कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर शाहिद आफ्रिदीने दिलेल्या वादग्रस्त विधानामुळे भारतीय खेळाडूंमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याची चर्चा आहे.

या साऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान चॅम्पियन्सच्या मालकाने स्पष्ट केलं की, “सामना रद्द झाल्यानंतर आम्हाला दोन गुण मिळाले, याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, पुढील सामन्यांमध्ये आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यात गट टप्प्यात किंवा बाद फेरीत टक्कर होणार नाही याची काळजी घेऊ. अंतिम फेरीत जर दोन्ही संघ पोहोचले, तेव्हाच ती परिस्थिती निर्माण होईल.”

World Championship of Legends 2025
Goa: ‘गोवा ऑलिंपिक भवन’ कधी होणार? 5 वर्षांपासून प्रयत्न; केंद्रीयमंत्री नाईक अध्यक्ष असूनही अपयश

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने म्हणजे फक्त खेळ नाही, तर भावनांचा प्रवाह असतो. त्यामुळे या सामन्याच्या रद्दबातलीमुळे दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली आहे. या प्रकरणानंतर WCL च्या पुढील कार्यक्रमांवर आणि क्रिकेटमधील राजकारणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com