6000 Crore Drug Case: 6000 कोटींच्या ड्रग्ज सिंडिकेटचा सूत्रधार भारताच्या ताब्यात, बापाच्या अटकेनंतर लेकावर तपास यंत्रणांची करडी नजर; कोण आहे वीरेंद्र सिंह बसोया?

Virendra Singh Baisoya Drug Mafia Deported Dubai: आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार आणि फरार माफिया वीरेंद्र सिंह बैसोया याला संयुक्त अरब अमिरातीतून भारतात आणण्यात आले.
Virendra Singh Baisoya Drug Mafia Deported Dubai
Virendra Singh Baisoya in 6000 crore drug syndicate caseDainik Gomantak
Published on
Updated on

Virendra Singh Baisoya Drug Mafia Deported Dubai: भारतातील ड्रग्जविरोधी कारवाईत मोदी सरकारला मोठे यश मिळाले असून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार आणि फरार माफिया वीरेंद्र सिंह बसोया याला संयुक्त अरब अमिरातीतून भारतात आणण्यात आले. युएईमधून एअर इंडियाच्या विमानाने त्याला भारतात आणल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या यशाबद्दल तपास यंत्रणांचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची ड्रग्जविरोधात 'झिरो टॉलरन्स'ची स्पष्ट भूमिका असून, परदेशात लपलेल्या कोणत्याही ड्रग्ज तस्कराला भारतीय कायद्याच्या कचाट्यातून सुटता येणार नाही, असा इशारा गृहमंत्री अमित शाह यांनी दिला.

Virendra Singh Baisoya Drug Mafia Deported Dubai
Pramod Sawant Amit Shah Meeting: गोव्यातील 'एसटी' आरक्षणाचा तिढा सुटणार?मुख्यमंत्र्यांची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा, गोवा दौऱ्यासाठीही आमंत्रण

वीरेंद्र बसोया हा पुणे येथील बहुचर्चित 6 हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात तसेच दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि एनसीबीच्या हजारो कोटींच्या ड्रग्ज नेटवर्कमध्ये मुख्य आरोपी आहे. एनसीबीने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती, ज्यानंतर त्याला दुबईत अटक करुन भारत सरकारच्या विशेष पुढाकाराने डिपोर्ट करण्यात आले. बसोया हा दिल्ली पोलिसांच्या 13 हजार कोटींच्या ड्रग्ज केसचा मुख्य आरोपी संदीप धुनिय याच्या अत्यंत जवळचा साथीदार मानला जातो. हे संपूर्ण नेटवर्क मेफेड्रोनसारख्या घातक ड्रग्जची आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः लंडनला तस्करी करण्यासाठी लॉजिस्टिक्स आणि वेगवेगळ्या कंपन्यांचा वापर करत होते.

Virendra Singh Baisoya Drug Mafia Deported Dubai
Mallikarjun Kharge Attacks Amit Shah: 'लाठीमारासाठी शहाच जबाबदार','जनता तुम्हाला बंद खोलीतून बाहेर खेचून काढेल!' मल्लिकार्जुन खर्गेंचा गृहमंत्री अमित शहांना राज्यसभेतून थेट इशारा

एनसीबी आणि पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले की, फेब्रुवारी 2024 मध्ये दिल्ली आणि पुण्यात मारलेल्या छाप्यांमध्ये सुमारे 970 किलोग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. हे ड्रग्ज डेल्टा लॉजिस्टिक्स या कंपनीच्या माध्यमातून थेट लंडनला पाठवण्याची मोठी तयारी बसोया याच्याच थेट सूचनेवरुन सुरु होती. या प्रकरणात कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकांसह अनेक हस्तकांना आधीच अटक करण्यात आली. वीरेंद्र बसोया याच्या अटकेमुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कचा पूर्णपणे पर्दाफाश होण्यास मदत होणार असून, सध्या परदेशात फरार असलेल्या त्याच्या मुलाच्या शोधासाठीही रेड कॉर्नर नोटीस जारी करुन शोधमोहीम तीव्र करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com