
India vs Pakistan Champions Trophy 2025
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा २५ वर्षे जुना विक्रम मोडला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू म्हणजे श्रीलंकेचा महेला जयवर्धने. त्याने ४४८ एकदिवसीय सामन्यात २१८ झेल घेतले आहेत. यानंतर रिकी पॉन्टिंगचे नाव येते, त्याने ३७५ एकदिवसीय सामने खेळले आहेत असून १६० झेल घेतले आहेत.
यानंतर आता विराट कोहलीचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. याआधी मोहम्मद अझरुद्दीन तिसऱ्या क्रमांकावर होता. मोहम्मद अझरुद्दीनने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ३३४ एकदिवसीय सामने खेळले आणि १५६ झेल घेतले आहेत.
पण विराट कोहलीने फक्त २९९ सामन्यांमध्ये १५७ झेल घेऊन एक नवा विक्रम केला आहे. आता तो भारताकडून सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला आहे. अझरुद्दीनने त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना २००० मध्ये खेळला होता, म्हणजेच तेव्हापासून कोणताही भारतीय खेळाडू हा विक्रम मोडू शकला नाही, जो आता मोडला गेला आहे.
विराट कोहली लवकरच रिकी पॉन्टिंगलाही मागे टाकू शकतो. जर त्याला संधी मिळाली तर तो या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येच त्यांना मागे टाकेल. कुलदीप यादवच्या चेंडूवर विराट कोहलीने नसीम शाहचा झेल घेतला. नसीमने १६ चेंडूत १४ धावा केल्या आणि कुलदीपने त्याचा डाव संपवला. या सामन्यात कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतल्या.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संघाला अपेक्षेप्रमाणे धावा करता आल्या नाहीत. माजी कर्णधार बाबर आज फक्त २३ धावांवर बाद झाल्याने पाकिस्तानला सुरुवातीलाच धक्का बसला.
यानंतर, इमाम उल हकही १० धावा काढून बाद झाला. दरम्यान, सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांच्यात जवळपास १०० धावांची भागीदारी झाली. पण तो बाद होताच संघाच्या विकेट पुन्हा पडू लागल्या. अशाप्रकारे पाकिस्तान संघ भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवू शकला नाही. पाकिस्तानने आपल्या डावात २४१ धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.