Sameer Amunekar
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात मोठा सामना आज भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात खेळला जात आहे.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवाननं नाणेफेक जिंकून खेळपट्टीची स्थिती लक्षात घेत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडिया गोलंदाजी करायला आली तेव्हा पहिलं षटक मोहम्मद शमीनं टाकलं.
पहिल्याच षटकात मोहम्मद शमी पाकिस्तानला धक्का देईल अशी अपेक्षा होती, पण घडलं उलटंच. त्यानं खूपच खराब गोलंदाजी केली.
पहिल्याच षटकात मोहम्मद शमीनं अनेक वाईड बॉल टाकले. साधारणपणे एका षटकात 6 चेंडू टाकावे लागतात, पण शमीनं त्या षटकात ११ चेंडू टाकले.
मोहम्मद शमीनं पहिल्या षटकात ५ वाईड चेंडू टाकले. त्यामुळे त्याला एका षटकात ११ चेंडू टाकावे लागले.
शमीच्या आधी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फक्त दोनच गोलंदाज असे केले होते. ज्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याच्या पहिल्या षटकात इतक्या अतिरिक्त धावा दिल्या आहेत.