Mahadevi Elephant: जनतेनं संघर्ष टाळावा, आमच्यासोबत उभं राहावं; वनतारानं स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय केलंय आवाहन?

Vantara Issued Statement: महादेवी (Mahadevi) हत्तीणीच्या (Elephant) प्रकरणात 'वनतारा' (Vantara) संस्थेने एक निवेदन जारी केले.
Vantara Issued Statement
Mahadevi ElephantDainik Gomantak
Published on
Updated on

Kolhapur Nandani Mahadevi Elephant: कोल्हापूर येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठातून स्थलांतरित केलेल्या महादेवी (Mahadevi) हत्तीणीच्या (Elephant) प्रकरणात 'वनतारा' (Vantara) संस्थेने एक निवेदन जारी केले. महादेवीला मठात परत आणण्याच्या जनभावनेचा आदर करत, ‘वनतारा’ने थेट जैन मठाच्या पूज्य स्वामीजी यांच्याशी संपर्क साधल्याचे यात स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन

वनताराने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, महादेवीला मठातून हलवण्याचा निर्णय त्यांनी स्वतःहून घेतलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशाचे पालन करत ही कार्यवाही करण्यात आली आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) या निर्णयाला मान्यता दिली. त्यामुळे, वनतारा केवळ या न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था आहे.

Vantara Issued Statement
Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

‘महादेवीच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध’

वनताराने पुढे म्हटले की, महादेवीच्या आरोग्याचे (Health) आणि दीर्घकाळाच्या कल्याणाचे (Welfare) रक्षण करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. तिला वनताराच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीने आणि कायद्याच्या तसेच नैतिक नियमांचे पालन करुन केली गेली.

जनभावनांचा आदर आणि थेट संवाद

दरम्यान, या प्रकरणात कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांची (Public Sentiment) आम्हाला पूर्ण जाणीव आहे, असेही ‘वनतारा’ने म्हटले. याच कारणामुळे त्यांनी आता करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून जैन मठाच्या पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद (Direct Communication) सुरु केला. कायदेशीर आणि पशुवैद्यकीय (Veterinary) तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, महादेवीच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासल्या जात आहेत, जेणेकरुन शांततामय मार्गाने तिच्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचाही सन्मान राखला जाईल.

Vantara Issued Statement
Kolhapur News: कोल्हापुरातील 'या' तालुक्याला व्हायचंय गोव्यात सामिल; CM प्रमोद सावंत, PM नरेंद्र मोदींना देणार निवेदन

विनम्र आवाहन

वनताराने स्पष्ट केले की, ते कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाहीत. ते फक्त अशा मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी काम करतात, जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत. शेवटी वनताराने आपल्या निवेदनाच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले की, त्यांनी संघर्षासाठी नाहीतर महादेवीच्या आणि अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक आणि शांत आयुष्याच्या अधिकारासाठी त्यांच्यासोबत उभे राहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com