Viral Video: मंचावरुन माइक फेकला अन् राडा घातला! काँग्रेस आमदाराचा हाय-व्होल्टेज ड्रामा; CM ला दिलं थेट चॅलेंज

Congress MLA Harish Dhami Controversy: संतापलेल्या आमदार महोदयाने थेट मंचावरुन माइक भिरकावून दिला आणि खाली उतरुन खुर्च्या उचलत साउंड ऑपरेटरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
Congress MLA Harish Dhami Controversy
Congress MLA Harish DhamiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Congress MLA Harish Dhami Controversy: उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील प्रसिद्ध जौलजीबी मेळ्याच्या मंचावर काँग्रेस आमदाराने केलेल्या हाय-व्होल्टेज ड्रामाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळात यावरुन मोठी खळबळ उडाली. धारचुला विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हरीश सिंह धामी यांनी आपले भाषण सुरु असतानाच माइक बंद केल्याच्या रागातून मंचावर जोरदार गोंधळ घातला.

संतापलेल्या आमदार महोदयाने थेट मंचावरुन माइक भिरकावून दिला आणि खाली उतरुन खुर्च्या उचलत साउंड ऑपरेटरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुमारे 10 मिनिटांच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार हरीश धामी हे राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना जाहीर आव्हान देतानाही स्पष्टपणे दिसत आहेत. या घटनेमुळे मेळ्याच्या ठिकाणी काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Congress MLA Harish Dhami Controversy
Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! हत्तीने दुचाकीस्वाराच्या छातीवर दोनदा ठेवला पाय, तरीही चमत्कारिकरीत्या वाचला तरुण; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील उपस्थित होते आणि ते कार्यक्रमातून रवाना झाल्यानंतर हा राडा सुरु झाला. आमदार हरीश धामी यांनी असा आरोप केला की, जौलजीबी मेळ्याचे अध्यक्षपद त्यांच्याकडे असूनही त्यांना जनतेसमोर आपले विचार मांडण्याची संधी दिली गेली नाही आणि जाणीवपूर्वक त्यांचा माइक मध्येच बंद करण्यात आला. या प्रकारामुळे त्यांचे समर्थकही कमालीचे आक्रमक झाले आणि त्यांनी साउंड ऑपरेटरवर आपला राग काढला. उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करत आमदार धामी यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना संताप अनावर झाला.

Congress MLA Harish Dhami Controversy
Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाले आजोबा! कोब्राला निळ्या ड्रममध्ये कोंडताच धरला ठेका, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

हरीश धामी यांनी मुख्यमंत्र्यांना धारचुला मतदारसंघातून निवडणूक लढवून जिंकून दाखवण्याचे आव्हान दिले. काँग्रेस (Congress) हायकमांडने आदेश दिल्यास आपण कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक जिंकून दाखवू, पण मुख्यमंत्री धारचुला येथून नक्कीच पराभूत होतील, असे ते म्हणाले. दुसरीकडे, भाजपने काँग्रेस आमदाराच्या या हिंसक वर्तनाचा आणि सार्वजनिक ठिकाणी केलेल्या शिवीगाळीचा तीव्र निषेध केला असून, जनता या कृत्याचा योग्य वेळी हिशोब करेल असा पलटवार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.