'फॉर्च्युनर कार अन् 50 लाख घेऊन ये'! लग्नाला 1 कोटी खर्च करुनही सासरचे समाधानी नव्हते; 24 वर्षीय तरुणीनं छळाला कंटाळून संपवलं जीवन

Dowry Harassment Fortuner Car Demand: ग्रेटर नोएडा परिसरातून हुंडाबळीची एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली.
Greater Noida Dowry Death Case
Dowry Harassment Fortuner Car DemandDainik Gomantak
Published on
Updated on

Greater Noida Dowry Death Case: ग्रेटर नोएडा येथून हुंडाबळीची एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली. लग्नाला अवघे 14 महिने झाले असतानाच, आणखी एक तरुणी हुंड्याच्या हव्यासाची बळी ठरली. हे संपूर्ण प्रकरण इकोटेक-3 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जलपुरा गावातील आहे, जिथे 24 वर्षीय नवविवाहिता दीपिका नागर हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. दीपिकाच्या माहेरच्या लोकांनी सासरच्यांवर अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला, तर दुसरीकडे पोलीस मात्र प्राथमिक स्तरावर या प्रकरणाकडे आत्महत्या म्हणून पाहत असून त्या दृष्टीने तपास करत आहेत.

कूडी खेडा गावातील रहिवासी संजय नागर यांनी आपली मुलगी दीपिका हिचा विवाह (Marriage) साधारण 14 महिन्यांपूर्वी जलपुरा गावातील ऋतिक नावाच्या तरुणाशी अत्यंत थाटामाटात करुन दिला होता. नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, या लग्नात सुमारे 1 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, एवढा मोठा खर्च करुनही सासरचे लोक समाधानी नव्हते.

Greater Noida Dowry Death Case
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी दीपिकाकडे तिच्या माहेरुन 'फॉर्च्युनर' कार आणि 50 लाख रुपये आणण्यासाठी सतत दबाव टाकण्यास सुरुवात केली. या मागणीसाठी दीपिकाला सतत मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या छळले जात होते. मृत तरुणीच्या आईने रडत-रडत सांगितले की, दीपिकाने फोनवर अनेकदा आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचा उल्लेख केला होता, परंतु समाज आणि लोकलाजेस्तव ती सर्व छळ मूकपणे सहन करत राहिली.

Greater Noida Dowry Death Case
Uttar Pradesh Storm: उत्तर प्रदेशात वादळ आणि पावसाचे 100 बळी, जनजीवन विस्कळीत; बाधितांना आर्थिक मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

दुर्दैवाने, रविवारी या छळाचा अत्यंत भयानक अंत झाला. माहेरच्या लोकांनी आरोप केला की, दीपिकाची सासरच्या लोकांनी निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रुग्णालयात सोडून सासरचे सर्वजण तिथून फरार झाले. जेव्हा दीपिकाच्या माहेरचे लोक रुग्णालयात पोहोचले, तेव्हा ती मृत अवस्थेत होती आणि तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक गंभीर खुणा दिसत होत्या. याच कारणास्तव तिचे कुटुंबिय या घटनेला आत्महत्या न मानता थेट सुनियोजित हत्या मानत आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी (Police) माहिती दिली की, प्राथमिक तपासात हा प्रकार हुंड्याच्या त्रासाला कंटाळून छतावरुन उडी मारुन आत्महत्येचा वाटत आहे. तरीही पोलिसांनी तत्परता दाखवत मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्यांविरुद्ध हुंडाबळी आणि हत्येसारख्या अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Greater Noida Dowry Death Case
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

पोलिसांनी याप्रकरणी त्वरित कारवाई करत मृतकेचा पती ऋतिक आणि सासरे मनोज प्रधान यांना अटक केली. पोलीस आता दीपिकाचा मोबाईल फोन, कॉल डिटेल्स आणि पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे पुढील तपास करत असून, हुंड्याच्या या राक्षसांमुळे आणखी एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com