Deepfake Video: योगी आदित्यनाथ देखील डीपफेक व्हिडिओचे बळी

Yogi Adityanath: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने सायबर गुन्हेगारांनी डीपफेक व्हिडिओ बनवला आणि मधुमेहाच्या औषधाचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा चेहरा वापरला.
UP CM Yogi Adityanath
UP CM Yogi Adityanath Dainik Gomantak
Published on
Updated on

Yogi Adityanath victim of deepfake video:

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील डीपफेक व्हिडिओचे बळी ठरले आहेत. या प्रकरणी लखनऊच्या सायबर पोलिस ठाण्यात 2 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

डीपफेक व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योगींचा चेहरा वापरून औषधे खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे. पोलिसांनी फेसबुकच्या मुख्यालयातून याबाबत माहिती मागवली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने सायबर गुन्हेगारांनी डीपफेक व्हिडिओ बनवला आणि मधुमेहाच्या औषधाचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा चेहरा वापरला.

याशिवाय आणखी एका व्हिडिओमध्ये दुसरे औषध खरेदी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

UP CM Yogi Adityanath
Bombay Stock Exchange बॉम्बने उडवण्याची धमकी, संशयाची सुई गुरपतवंत सिंग पन्नूकडे

या प्रकरणांचा तपास करण्यासाठी दोन पथके कार्यरत आहेत. या दोन्ही खात्यांची माहिती फेसबुककडून मागवण्यात आली आहे.

AI च्या माध्यमातून व्हिडिओमध्ये टाकलेल्या ऑडिओमध्ये असे म्हटले जात आहे की, 'औषध भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. जो कोणी या वेबसाइटवरून औषध खरेदी करेल त्याला देवाचा मान मिळेल. लोकांना फसवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा चेहरा व्हिडिओमध्ये वापरण्यात आला आहे.

UP CM Yogi Adityanath
Rahul Gandhi: ''पीएम मोदींना संविधान रद्द करायचंय...'' भाजप खासदाराच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार

या दोन्ही प्रकरणांची पोलिसांनी स्वत:हून दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत. यातून सायबर गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. सायबर गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच याची पुष्टी होणार आहे.

फेसबुकच्या माध्यमातून दिलेली माहिती या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची ठरणार आहे. कारण त्यातूनच पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com