VIDEO: "राजा दशरथ की भी 3 रानियां थी..." एकाच तरुणासोबत तिघींचा विवाह; रीलस्टार बहिणींची सोशल मीडियावर चर्चा!

Amroha Man Marries 3 Women Viral Video: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका अनोख्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Amroha Man Marries 3 Women Viral Video
Amroha Man Marries 3 Women Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Amroha Man Marries 3 Women Viral Video: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका अनोख्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तीन तरुणींनी एकाच तरुणाशी लग्न केल्याचा दावा करणारे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संबंधित तरुणी सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर असून त्यांनी आपल्या कॅमेरामनसोबत लग्न केल्याचे सांगितले.

या अनोख्या लग्नामुळे (Marriage) परिसरात विविध प्रतिक्रिया उमटल्या असून पोलिसांनीही संबंधित सर्वांची चौकशी केली. मात्र, अधिकृत तक्रार अद्याप दाखल झालेली नसल्याची माहिती समोर आली.

व्हायरल व्हिडिओनंतर चर्चेला उधाण

uttar_pradesh_kesari1 ने शेअर केलेला व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण तीन तरुणींसोबत लग्नाचे विधी पार पाडताना दिसत आहे. सात फेरे घेणे, मंगळसूत्र घालणे आणि कुंकू लावण्याचे दृश्य या व्हिडिओत पाहायला मिळते. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाल्यानंतर या घटनेबाबत विविध चर्चा सुरु झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण या तिघींसाठी व्हिडिओ शूट करण्याचे काम करत होता. एकत्र काम करत असताना त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

Amroha Man Marries 3 Women Viral Video
Viral Video: 'हिरोगिरी' पडली महागात! स्टंट करताना बाईकचे चाकच निघाले; दोघेही तोंडावर आपटले, थरारक व्हिडिओ व्हायरल

'आम्ही कायम एकत्र राहणार'

लग्नानंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणींनी आपण लहानपणापासून एकत्र राहण्याची शपथ घेतली होती आणि भविष्यातही वेगळे राहायचे नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांचा दावा आहे. या निर्णयावर समाजाकडून होणाऱ्या टीकेची पर्वा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करत ऐतिहासिक उदाहरणांचाही उल्लेख केला.

Amroha Man Marries 3 Women Viral Video
Stunt Viral Video: 'बच गया बेटा, नाहीतर चांगलीच जिरली असती!' धावत्या वाहनातून लटकणाऱ्या पठ्ठ्याला स्टंटबाजी पडली महागात; काळजाचा ठोका चुकवणारा थरार व्हायरल

यूट्यूबद्वारे मिळाली ओळख

मिळालेल्या माहितीनुसार, या तिघींपैकी दोन सख्ख्या बहिणी असून तिसरी त्यांची नातेवाईक आहे. सर्वजणी शिक्षण घेत असून सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करण्याचे काम करतात. त्यांचा स्वतंत्र यूट्यूब चॅनल असून त्यावर मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. विकास नावाचा युवक त्यांच्या व्हिडिओ शूट आणि निर्मितीमध्ये मदत करत होता. त्याच्यासोबत त्यांनी लग्न केल्याचा दावा केला.

Amroha Man Marries 3 Women Viral Video
Viral Video: 'FIFA World Cup' हातातून निसटला, मेस्सी गुडघ्यावर बसून रडला; फायनलनंतरचा भावनिक व्हिडिओ व्हायरल

कुटुंबीयांची नाराजी, पोलिसांची चौकशी

या घटनेनंतर संबंधित तरुणींच्या कुटुंबीयांनी आणि काही स्थानिकांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली. प्रकरण चर्चेत आल्यानंतर पोलिसांनी संबंधित चारही जणांना चौकशीसाठी बोलावले. चौकशीदरम्यान त्यांनी सर्वजण सज्ञान असल्याचे सांगितले आणि हे लग्न परस्पर संमतीने केल्याचा दावा केला. पोलिसांनी त्यांचे वय आणि ओळख दर्शवणारी कागदपत्रेही तपासली. मात्र, या प्रकरणात कोणत्याही पक्षाकडून अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याने पुढील कायदेशीर कारवाई झालेली नाही.

Amroha Man Marries 3 Women Viral Video
Airbnb Viral Video: वापरलेली भांडी, अन्नाचा कचरा अन् रिकाम्या पॅकेट्सचा खच! गोव्यातील Airbnbचा व्हिडिओ व्हायरल, पर्यटकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह

कायदेशीर बाजूही महत्त्वाची

या घटनेची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असली, तरी अशा लग्नांना भारतातील वैयक्तिक कायदे लागू होतात. कोणत्याही लग्नाची वैधता संबंधित धर्म, लागू असलेले वैवाहिक कायदे आणि न्यायालयीन निकषांवर अवलंबून असते. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ किंवा संबंधित व्यक्तींच्या दाव्यांवरुन लग्न कायदेशीरदृष्ट्या वैध आहे की नाही, याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com