Viral Video: 'FIFA World Cup' हातातून निसटला, मेस्सी गुडघ्यावर बसून रडला; फायनलनंतरचा भावनिक व्हिडिओ व्हायरल

Lionel Messi crying video: 2026 च्या FIFA विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनावर 1-0 अशी मात करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले.
Lionel Messi crying video
Lionel Messi emotional after world cup finalDainik Gomantak
Published on
Updated on

2026 च्या FIFA विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनावर 1-0 अशी मात करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. न्यू जर्सीतील मेटलाइफ स्टेडियमवर झालेल्या या रोमांचक लढतीत नियोजित 90 मिनिटांत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला आणि त्याचवेळी स्पेनने निर्णायक गोल करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या पराभवामुळे अर्जेंटिनाचे सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

पराभवानंतर मेस्सीला अश्रू अनावर

अंतिम शिट्टी वाजल्यानंतर मैदानावर अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी गुडघ्यावर बसला आणि पराभवाचे दुःख त्याला लपवता आले नाही. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतरही मेस्सीच्या डोळ्यांत अश्रू होते. त्याचा हा भावनिक क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून जगभरातील फुटबॉलप्रेमींनी त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

स्टेडियममध्ये उपस्थित हजारो चाहत्यांनी "Messi... Messi..." असा जयघोष करत आपल्या लाडक्या खेळाडूला पाठिंबा दिला. अनेक चाहत्यांच्या हातात मेस्सीच्या गौरवाचे पोस्टर्स आणि प्लॅकार्ड्स दिसून आले. पराभव असूनही त्याला मिळालेला हा सन्मान फुटबॉलविश्वातील संस्मरणीय क्षण ठरला.

Lionel Messi crying video
Goa Weather: राज्यात तुरळक पावसाच्या सरी, काही भागात झाडे पडण्याच्या घटनांची नोंद

पराभवातही मेस्सीच्या नावावर मोठा विक्रम

अर्जेंटिनाला विजेतेपद राखता आले नसले तरी मेस्सीने आपल्या कारकिर्दीत आणखी एका ऐतिहासिक टप्प्याला गवसणी घातली. तो FIFA विश्वचषकाच्या इतिहासात तीन अंतिम सामने खेळणारा जगातील केवळ दुसरा फुटबॉलपटू ठरला. तसेच 39 वर्षांच्या वयात विश्वचषकाची अंतिम फेरी खेळणारा सर्वात वयोवृद्ध आउटफिल्ड खेळाडू म्हणूनही त्याने नवा विक्रम नोंदवला.

Lionel Messi crying video
Goa Dairy Consultant Appointment: कन्सल्टंट नियुक्तीखाली पैशांची उधळपट्टी; गोवा डेअरीवर दूध उत्पादकांचा आरोप

एन्झो फर्नांडेझच्या रेड कार्डने फिरले सामन्याचे चित्र

सामन्यातील निर्णायक क्षण नियोजित वेळ संपण्यापूर्वी आला. अर्जेंटिनाचा मिडफिल्डर एन्झो फर्नांडेझ याला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यानंतर पंचांनी रेड कार्ड दाखवले. त्यामुळे अर्जेंटिनाला उर्वरित सामना दहा खेळाडूंनी खेळावा लागला.

या संख्यात्मक फायद्याचा स्पेनने पुरेपूर उपयोग केला. अतिरिक्त वेळेत त्यांनी आक्रमणाची धार वाढवली आणि अखेर फेरान टोरेस याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर स्पेनने विजय निश्चित केला. या विजयानंतर स्पेनच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला, तर दुसरीकडे अर्जेंटिनाच्या खेळाडूंसह मेस्सीच्या चेहऱ्यावर प्रचंड निराशा दिसून आली.

पराभव असूनही मेस्सीच्या जिद्दीला आणि योगदानाला जगभरातून सलाम केला जात असून, अंतिम सामन्यानंतरचा त्याचा भावनिक क्षण 2026 विश्वचषकातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या दृश्यांपैकी एक ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com