Yogi Government मधील आमदार अन् खासदार घेतायेत मोदी सरकारच्या योजनेचा लाभ

Uttar Pradesh: उत्तरप्रेदशातील खासदार आणि आमदारही मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत.
Sonbhadra MP Pakori Kol
Sonbhadra MP Pakori KolDainik Gomantak

Uttar Pradesh News: उत्तरप्रेदशातील खासदार आणि आमदारही मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. एवढेच नाही तर निधीचे पैसेही त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात जमा होत आहेत. मिर्झापूर येथील सोनभद्रचे खासदार पकोरी कोल यांचे संपूर्ण कुटुंब या योजनेचा लाभ घेत आहे.

दरम्यान, किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांमध्ये सोनभद्रचे खासदार पकोरी कोल यांची पत्नी माजी ब्लॉक प्रमुख पन्ना देवी आणि छांबे विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल प्रकाश कोल यांचे नाव आहे.

Sonbhadra MP Pakori Kol
TRS चे 12 आमदार देणार राजीनामे, भाजपच्या दाव्याने तेलंगणात राजकीय खळबळ

दुसरीकडे, काही महिन्यांपूर्वी सरकारने (Government) प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Krishi Samman Nidhi Yojana) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर कृषी विभागाने पडताळणीच्या कामास सुरुवात केली होती. या पडताळणीत खासदार, आमदारांची नावे उघड झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. किसान सन्मान निधीची रक्कम त्यांच्या पटेहरा येथील पंजाब अँड सिंध बँकेच्या खात्यात जमा होत होती.

Sonbhadra MP Pakori Kol
जगन मोहन रेड्डी यांच्या आईने YSR काँग्रेसचा दिला राजीनामा, तेलंगणात मुलीला देणार पाठिंबा

खासदार म्हणाले, पैसे का आले कळले नाही

खासदार पकोरी कोल यांचे म्हणणे आहे की, 'कोणत्या कारणासाठी पैसे बँकेत पाठवले गेले याची कोणतीही माहिती नाही.' तर दुसरीकडे, आमदार राहुल कोल यांचा मानधन निधी यापूर्वीच रद्द करण्यात आल्याचे कृषी उपसंचालक अशोककुमार उपाध्याय (Ashok Kumar Upadhyay) यांचे म्हणणे आहे. आता यादी केवळ पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com