Telangana BJP: तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार यांनी गुरुवारी दावा केला की, 'टीआरएसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास तयार आहेत.' केवळ मुनुगोडेच नाही तर राज्यातील अनेक जागांवर पोटनिवडणूक होऊ शकते, असा दावाही त्यांनी केला आहे. 'प्रजा संग्राम पदयात्रे'च्या तिसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी दावा केला की, 'टीआरएसचे हे आमदार सत्ताधारी पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.'
दरम्यान, भाजप (BJP) प्रमुख म्हणाले की, 'टीआरएसच्या अनेक आमदारांना या सरकारमध्ये (Government) भविष्य नाही असे वाटते. टीआरएस सरकारविरोधातील बंड अधिकच बळकट होत आहे.'
संजय कुमार पुढे म्हणाले की, 'मुनुगोडे पोटनिवडणूक राज्याचे भवितव्य ठरवेल. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार आता निवडणुका झाल्या तर भाजप 62 जागा जिंकेल.' त्यांच्या मते, टीआरएस प्रशासनाप्रती जनतेच्या वाढत्या वैमनस्यामुळे भाजपचा अपेक्षित मताधिक्य वाढेल.
दुसरीकडे, काँग्रेसचे (Congress) खासदार कोमातिरेड्डी व्यंकट रेड्डी (Brother of Munugode MLA Raj Gopal Reddy) हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, "ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, त्यांचे पक्षात स्वागत आहे." व्यंकट रेड्डी हे दीर्घकाळापासून टीआरएसविरोधात लढत आहेत.
तसेच, संजय पुढे असेही म्हणाले की, 'मुनुगोडे पोटनिवडणुकीशिवाय जुन्या शहरातील विधानसभा जागांवरदेखील भाजपचा डोळा आहे.' पुढील निवडणुकीत पक्ष हैदराबाद संसदीय जागा जिंकेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. करीमनगरचे खासदार म्हणाले, “तिकिटांची हमी नाही. पक्षाचे संसदीय बोर्ड निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची निवड करेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.