Punjab News: पंजाबमधील अमृतसरमध्ये पोलिसांनी आंतरराज्यीय हेरॉईन तस्करीच्या रॅकेटच्या दोन सराईतांना अटक केली. त्यांच्याकडून 10 किलो हेरॉईन जप्त केले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अमेरिकन बनावटीचे अत्याधुनिक ड्रोनही जप्त केले आहे. ड्रोनमध्ये डीजेआय मालिकेतील इन्फ्रारेड आधारित नाईट व्हिजन कॅमेरा देखील आहे. पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही सर्वात मोठी गॅंग आहे. ते पुढे म्हणाले की, अमृतसर पोलिसांनी गेल्या एका महिन्यात पाच ड्रोन जप्त केले आहेत.
डीजीपी पुढे म्हणाले की, एसएसपी स्वप्ना शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पाच महिन्यांपासून तस्करांविरोधात मोहीम राबवली जात आहे. या एपिसोडमध्ये पोलिसांनी रविवारी अटक केलेल्या तस्करांची ओळख पटवली असून ते घरिंडा पोलीस (Police) स्टेशन परिसरात राहणारे दलबीर सिंग आणि जगदीश सिंग आहेत. या गॅंगचे सदस्य गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने ड्रग्जची तस्करी शेजारच्या राज्यात करत होते. अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर कोणताही गुन्हा दाखल नाही.
गौरव यादव यांनी सांगितले की, एसएसपी स्वप्ना शर्मा यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे ऑपरेशन करुन या गॅंगचा पर्दाफाश केला. हे लोक सीमेपलीकडून हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि इतर राज्यात हेरॉईन पाठवत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यांच्या ताब्यातून 20 लाख रुपये किमतीचे यूएस बनावटीचे ड्रोन जप्त करण्यात आले आहे. हे ड्रोन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. यात दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि इन्फ्रारेड आधारित नाईट व्हिजन कॅमेरा आहे.
एका महिन्यात पाच ड्रोन जप्त केले
डीजीपी गौरव यादव पुढे म्हणाले की, ग्रामीण पोलिसांनी महिनाभरात पाच ड्रोन जप्त करुन मोठे यश मिळवले आहे. 29 नोव्हेंबर रोजी बीओपी हरभजन पोस्ट, खेमकरन, तरणतारण येथून एक हेक्साकॉप्टर आणि 6.8 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. 30 नोव्हेंबर रोजी तरनतारनमधील खाल्डा येथील तारा सिंह गावात एक तुटलेला ड्रोन सापडला होता. 2 डिसेंबर रोजी तरनतारनच्या खेमकरण परिसरातून एक हेक्साकॉप्टर ड्रोन आणि 5.6 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. 4 डिसेंबर रोजी तरनतारनमधील बीओपी कालिया येथून एक क्वाडकॉप्टर आणि 3.06 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.