Punjab: पंजाब सरकारने घेतला मोठा निर्णय, गाण्यात यापुढे दाखवता येणार नाही 'गन'

पंजाबी गाण्यात गन क्लचर (आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या गाण्यांवर बंदी घातली आहे.
bhagwant man
bhagwant mandainik gomantak
Published on
Updated on

पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहे. या टीकेच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने रविवारी कडक पावले उचलली आहेत. पंजाबी गाण्यात गन क्लचर (बंदूक संस्कृती) आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या गाण्यांवर बंदी घालणे तसेच, बंदुकीचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन यावर बंदी घातली आहे. सरकारने पुढील तीन महिन्यांत शस्त्र परवान्यांचे पुनरावलोकन करण्याचे आदेशही दिले आहेत.

bhagwant man
Spanish Village On Sale: काय सांगता! अख्ख गावंच काढलंय विकायला, किंमत फक्त एवढी

राज्य सरकाने काढलेल्या आदेशात, कोणत्याही समुदायाविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणे करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून आप सरकारवर केला जात आहे. पंजाबमध्ये नुकत्याच दोन मोठ्या घटना घडल्या. 4 नोव्हेंबर रोजी शिवसेना (टकसाळी) नेते सुधीर सुरी आणि 10 नोव्हेंबर रोजी डेरा सच्चा सौदाचे अनुयायी प्रदीप सिंह यांची हत्या करण्यात आली होती.

bhagwant man
Australia: मित्राच्या बर्थडे पार्टीत मोडून घेतला पाय, 'हा' ऑस्ट्रेलियन खेळाडू तीन महिने क्रिकेटला मुकणार

राज्याच्या गृहविभागाने पोलीस प्रमुख, पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. रविवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार शस्त्रे आणि हिंसाचाराचा उदोउदो करणाऱ्या गाण्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करण्यावर देखील पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक स्थळे, विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमात शस्त्र बाळगणे आणि दाखवणे यावर पूर्ण बंदी घातली आहे.

शस्त्र परवान्याचा तीन महिन्यांच्या आत फेरविचार करण्यात यावा तसेच, एखाद्या चुकीच्या व्यक्तीला शस्त्र परवाना देण्यात आला असेल तर तो तत्काळ रद्द करण्यात यावा. असेही या आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com