पार्टी तो बनती है! तेलंगणातील नेत्याने चिकन अन् दारुच्या बाटल्यांचे केले वाटप, Video Viral

KCR National Party: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांनी राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
TRS Leader Rajanala Srihari
TRS Leader Rajanala SrihariDainik Gomantak
Published on
Updated on

TRS Leader Distributes Alcohol-Chicken: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांनी राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पण त्याआधीच मंगळवारी वारंगलमध्ये त्यांच्या पक्षाच्या नेत्याने स्थानिक लोकांमध्ये चिकन आणि दारुच्या बाटल्यांचे वाटप केले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

IANS च्या वृत्तानुसार, कार्यक्रमस्थळी KCR यांचे मोठे कट-आउट (पोस्टर) लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्यांचा मुलगा केटी रामाराव, तेलंगणा राष्ट्र समिती (TSR) स्थानिक नेते हे स्वतः वारंगलमधील लोकांना चिकन आणि दारुच्या बाटल्या देताना दिसत आहेत. श्रीहरी यांच्याकडून चिकन आणि दारु घेण्यासाठी रांगेत उभे असलेले बहुतेक लोक मजूर होते. केसीआर यांच्या भारतीय राष्ट्र समिती (BRS) च्या प्रस्तावित प्रक्षेपणाचा उत्सव म्हणून चिकन आणि मद्य वितरणाकडे पाहिले जात आहे.

श्रीहरी म्हणाले की, 'आम्हाला केसीआर यांना पंतप्रधान आणि केटीआर यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे.' सोशल मीडियावर (Social Media) चिकन आणि मद्य वितरीत केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी टीआरएसवर जोरदार निशाणा साधला. तर सोशल मीडिया यूजर्संनी केसीआर यांच्या पक्ष नेत्याचाही निषेध केला.

TRS Leader Rajanala Srihari
Kejriwal vs Saxena: दिल्लीकरांची मोफत वीज थांबवणार नाही, गुजरातमध्येही देऊ

तसेच, बीआरएसला 'बोटल राष्ट्र समिती' असे संबोधित करत तेलंगणा काँग्रेसने (Congress) म्हटले की, 'बीआरएसचे निवडणूक चिन्ह 'कार' नसून 'क्वार्टर' असावे. भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते विजय गोपाल यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'प्रिय भारतीयांनो, हे पाहा, देशाचे नेतेही राष्ट्रीय स्तरावर असेच करतील.'

दुसरीकडे, टीआरएस बुधवारी आपल्या आमदारांची आणि इतर प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक घेणार आहे, जिथे केसीआर टीआरएसला बीआरएसमध्ये बदलण्याचा निर्णय जाहीर करु शकतात. तर केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आरोप केला की, 'केसीआर त्यांचा एकमेव राजकीय सहयोगी असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या एआयएमआयएमला मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय पक्षाविषयी बोलत आहेत.'

TRS Leader Rajanala Srihari
Quota for Gurjar bakarwals: जम्मू-काश्मिरमध्ये आरक्षणाची अमित शहांची घोषणा

रेड्डी पुढे म्हणाले की, केसीआर यांचे कुटुंबीय स्वप्न पाहत आहे की, 'केसीआर राष्ट्रीय पक्ष काढतील आणि पंतप्रधान होतील. त्यांची मुलगी महत्त्वाच्या मंत्रालयात केंद्रीय मंत्री आणि मुलगा तेलंगणाचा मुख्यमंत्री होणार आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com