Kejriwal vs Saxena: दिल्लीकरांची मोफत वीज थांबवणार नाही, गुजरातमध्येही देऊ

उपराज्यपालांना मोफत वीजेच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर केजरीवाल आक्रमक
Arvind Kejriwal
Arvind KejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

Kejriwal vs Saxena: दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी अरविंद केजरीवाल सरकारच्या वीज अनुदान योजनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटरवरून भाजपवर गंभीर आऱोप केले आहेत. तसेच दिल्लीकरांची मोफत वीज थांबवणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

Arvind Kejriwal
Quota for Gurjar bakarwals: जम्मू-काश्मिरमध्ये आरक्षणाची अमित शहांची घोषणा

केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाच्या मोफत वीज गॅरंटी स्कीमची भुरळ गुजरातमधील लोकांनाही पडली आहे. या योजनेचे गुजरातमध्ये कौतूक होत आहे. म्हणून भाजपला दिल्लीमध्ये ही योजना बंद करायची आहे. पण, दिल्लीकरांनो माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमची मोफत वीज कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही. गुजरातच्या लोकांनाही मी विश्वास देऊ इच्छितो, की गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार बनल्यावर १ मार्चपासून गुजरातमध्येही मोफत वीज दिली जाईल.

आणखी एका ट्विटमध्ये केजरीवाल यांनी म्हटले आहे की, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर इतका कर लावला आहे, महागाई वाढवून ठेवली आहे, तुम्ही लोकांचे अक्षरशः रक्त शोषत आहात. अशात मी जर लोकांना मोफत वीज देऊन त्यांना दिलासा देत असेन तर तेही तुम्हाला सहन होत नाही का? तेदेखील तुम्ही रोखू पाहता? पण, मी ते कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.

Arvind Kejriwal
PM Narendra Modi: यांच्या सभेसाठी पत्रकारांकडे कॅरेक्टर सर्टिफिकेटची मागणी

वीज वितरण कंपन्यांना अनुदानाची रक्कम देण्याबाबत अनियमितता असल्यावरून याबाबत झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत. या प्रकरणी उपराज्यपालांनी मुख्य सचिवांकडून 7 दिवसात अहवाल मागवला आहे.

उपराज्यपालांच्या मते, त्यांच्या सचिवालयाला यात मोठा घोटाळा झाल्याची तक्रार मिळाली आङे. आपचे नेते जॅस्मिन शाह आणइ खासदार एन. डी. गुप्तांचे पुत्र नवीन गुप्ता या दोघांना बीआऱपीएल आणि बीवायपीएल या वीज वितरण कंपन्यांत संचालक केले गेले. त्यांनीच हा घोटाळा केला आहे. या अनिल अंबानी समुहातील कंपन्या आहेत. यात दिल्ली सरकारची ४९ टक्के मालकी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com