...म्हणून प्रवाशाने इंडिगोची वेबसाईट केली हॅक

इंडिगो एअरलाईनकडून प्रवाशाच्या दाव्याचं खंडन, वेबसाईट सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण
Indigo Airline Flight
Indigo Airline FlightDainik Gomantak

विमानात सहप्रवाशासोबत आपल्या सामानाची अदलाबदल झाल्याने एका प्रवाशाने चक्क इंडिगो एअरलाईन्सची वेबसाईटच हॅक केल्याचा दावा केला आहे. नंदन कुमार असं या प्रवाशाचं नाव असून त्याने इंडिगोच्या ग्राहक सेवेवर ताशेरेच ओढले आहेत. तसंच आपण इंडिगोचा गोपनीय डेटा लीक केल्याचा दावाही केला आहे.

विमान प्रवासादरम्यान आपल्या सहप्रवाशासोबत बॅगेची अदलाबदल झाल्याची चूक झाल्याची कबुली प्रवाशाने दिली. नंदन कुमार या प्रवाशाने पाटणा ते बंगळुरु (Bangalore) असा इंडिगोच्या 6E-185 विमानाने रविवारी 27 मार्च रोजी प्रवास केला होता. बॅगेतील सारखेपणामुळे या प्रवाशाच्या बॅगेची सहप्रवाशाच्या बॅगेसोबत अदलाबदल झाली. घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीने बॅग बदलल्याचं सागितल्याचं प्रवाशाने म्हटलं आहे. आपली बॅग बदलल्याचं लक्षात येताच प्रवाशाने इंडिगोच्या हेल्पलाईनला संपर्क केला.

Indigo Airline Flight
श्रीलंकेची बत्ती गुल; देश रोज 10 तास अंधारात

बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यानंतर प्रवाशाचं इंडिगोच्या प्रतिनिधीशी बोलणं झालं. मात्र ग्राहक सेवा प्रतिनिधीने गोपनीयतेचं कारण देत सहप्रवाशाची माहिती देण्यास नकार दिला. यामुळे हतबल झालेल्या प्रवाशाने एक दिवस वाट पाहिली. मात्र इंडिगोकडून (Indigo Airlines) कोणताही संपर्क करण्यात न आल्याने त्याने थेट वेबसाईटच हॅक करण्याचा निर्णय घेतला. बरेच प्रयत्न करुनही प्रवाशाला आपल्या सहप्रवाशाची माहिती मिळाली नाही. बॅगेवरील टॅग वापरुनही माहिती काढण्यात प्रवाशाला अपयश आलं.

Indigo Airline Flight
Viral Video : दिव्यांग तरुण जीवाची भीक मागत राहिला, पण...

बऱ्याच अपयशी प्रयत्नांनंतर प्रवाशाने F12 बटण दाबून डेव्हलपर मोडमध्ये जात इंडिगोची वेबसाईट ओपन केली. यानंतर काही प्रयत्नातच सहप्रवाशाचा फोन नंबर आणि इमेल आयडी मिळवण्यात यश आल्याचा दावा प्रवाशाने केला आहे. सहप्रवासी आपल्या घराजवळच राहात असल्याने त्याच्याशी संपर्क साधून आपण आपली बॅग परत मिळवल्याचं ट्विट प्रवाशाने केलं आहे. इतकंच नाही तर इंडिगोला आपली वेबसाईट सुरक्षित करण्याचा सल्लाही प्रवाशाने (Tourist) दिला आहे. मात्र दुसरीकडे इंडिगोने आपली वेबसाईट पूर्णपणे सुरक्षित असून प्रवाशाने केलेला दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. कोणताही प्रवासी केवळ पीएनआर क्रमांक, शेवटचं नाव, संपर्क क्रमांक, आणि इमेल वापरुन आपल्या बुकिंगची माहिती मिळवू शकतो. बाकी कोणत्याही मार्गाने प्रवाशांचा डेटा मिळवणं शक्य नसल्याचं इंडिगोने स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com