वाघा-अटारी बॉर्डरप्रमाणे बीटिंग रिट्रीट आता राजस्थानमध्ये!

राजस्थानला (Rajasthan) भेट देणाऱ्या पर्यटकांनाही आता वाघा-अटारी बॉर्डरचा अनुभव घेता येणार आहे.
Beating Retreat Ceremony
Beating Retreat Ceremony Dainik Gomantak
Published on
Updated on

राजस्थानला भेट देणाऱ्या पर्यटकांनाही आता वाघा-अटारी बॉर्डरचा अनुभव घेता येणार आहे. बीटिंग रिट्रीट सेरेमनी पाकिस्तानला (Pakistan) लागून असलेल्या राजस्थानच्या तनोट-बोलियानवाला सीमेजवळ होणार आहे. बीएसएफच्या (BSF) मदतीने, राज्य पर्यटन विभाग येत्या 18 महिन्यांत पर्यटन सर्किट तयार करण्याचा विचार करत आहे.

Beating Retreat Ceremony
मुख्यमंत्री योगी सक्त, यूपीत सणांआधी लाऊडस्पीकर हटवण्याची मोहीम झाली सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी सुमारे 19 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे राजस्थानमधील पर्यटनाला (Tourism) चालना मिळेल. पर्यटन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टूरिस्ट सर्किटमध्ये तनोट माता मंदिर, किशनगड किल्ला आणि लोंगेवाला वॉर मेमोरियल देखील असेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थानमधील (Rajasthan) तनोट-बोलियानवाला सीमेचा इतिहास पर्यटकांसाठी आकर्षण ठरला आहे. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव गायत्री राठोड यांनी सांगितले की, ''तनोट माता पर्यटन संकुलाच्या विकासामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. याद्वारे सीमा सुरक्षा दलाचे खडतर जीवनही पर्यटकांना अनुभवता येणार आहे. टुरिस्ट सर्किटचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासाठी सरकार सुमारे 19 कोटी रुपये खर्च करणार आहे. माहितीनुसार, 18 महिन्यांत ते पूर्ण करण्यात येणार आहे.''

तनोट माता मंदिर परिसराचा विकास

लोंगेवाला बॉर्डर ही भारताची प्रसिद्ध सीमा आहे. विशेष म्हणजे या सीमेला एक इतिहास आहे. 1971 च्या युद्धात भारतीय लष्कराची ताकद इथे पाहायला मिळाली होती. राजस्थानला भेट देणाऱ्या पर्यटकांनाही हे ठिकाण खूप आवडते. यासोबतच तनोट माता मंदिरालाही पर्यटकांची विशेष पसंती आहे. दररोज सुमारे तीन हजार भाविक तनोट माता मंदिराला भेट देतात. प्रशासनाच्या परवानगीनंतर अनेक पर्यटक बलियानवाला बॉर्डर पॉइंटवरही जातात. परंतु इथे अतिशय मर्यादित सुविधा आहेत. आता तनोट माता मंदिर परिसर विकसित झाल्यानंतर सार्वजनिक सुविधांसह कॅफेटेरिया, अ‍ॅम्फिथिएटर, लहान मुलांच्या क्रियाकलाप क्षेत्राशी संबंधित गोष्टीही उपस्थित राहणार आहेत.

Beating Retreat Ceremony
बीएसएफला बंगालमध्ये घुसू देऊ नका, ममता बॅनर्जींचा पोलिसांना आदेश

राजस्थानमध्येही बीटिंग रिट्रीट सोहळा

पर्यटकांना आता बलियानवाला सीमेवर जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. तिथून ते बीटिंग रिट्रीट सोहळाही पाहू शकतील. त्याचबरोबर या परिसरात पर्यटनाला चालना मिळाल्याने दूरवरच्या गावातील लोकांनाही आपली कला दाखवण्याची संधी मिळणार आहे. टूरिस्ट सर्किट विकसित केल्यास राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच वाघा-अटारी बॉर्डरसारख्या बीटिंग रिट्रीटचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. हे टुरिस्ट सर्किट 18 महिन्यांत तयार होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com