मुख्यमंत्री योगी सक्त, यूपीत सणांआधी लाऊडस्पीकर हटवण्याची मोहीम झाली सुरु

उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) ईद, अक्षय्य तृतीया आणि इतर सणांच्या आधी लाऊडस्पीकरविरोधात मोहीम सुरु झाली आहे.
CM Yogi Adityanath
CM Yogi AdityanathDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तरप्रदेशात ईद, अक्षय्य तृतीया आणि इतर सणांच्या आधी लाऊडस्पीकरविरोधात मोहीम सुरु झाली आहे. हे सर्व यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या आदेशानंतर युध्दपातळी होत आहे. उत्तर प्रदेशात धार्मिक कार्यक्रमांना कोणीही परवानगी देणार नाही, असे स्पष्ट आदेश स्पष्ट देण्यात आले आहेत. माध्यमाशी बोलताना यूपी पोलिसांचे एडीजी लॉ ऑर्डर प्रशांत कुमार म्हणाले की, 'धर्माच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.'

CM Yogi Adityanath
पंतप्रधान मोदींनी सुनावल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर

प्रशांत कुमार म्हणाले, ''सध्या लोक मेरठमध्ये जागरण करण्यास तयार होते. मात्र आम्ही त्यास परवानगी दिली नाही. असाच प्रयत्न मथुरेतही सुरु होता, परंतु आम्ही थांबवला. काही फोटो यूपीमधील सीतापूर, रायबरेली, सहारनपूरचे आहेत. जिथे मंदिर (Temple) आणि मशीद या दोन्ही ठिकाणांहून लाऊडस्पीकर हटवण्यात येत आहेत.''

दरम्यान, पोलिसांच्या (Police) सांगण्यावरुन अलाहाबादमधील प्रसिद्ध लेटे हनुमान मंदिरातील लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला. त्याचबरोबर अलाहाबादमधील जामा मशिदीतील लाऊडस्पीकरही काढून टाकण्यात आला. त्यावर मस्जिद कमिटीचे प्रमुख अलाहाबादचे (Allahabad) मौलाना जावेद आरफी म्हणाले, ''प्रशासनाने काहीही केले तरी आम्ही एक आहोत. आम्ही लाऊडस्पीकर काढून टाकला आहे. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार काम करावं लागणार आहे.''

CM Yogi Adityanath
''मंदिर असो की मशीद'', लाऊडस्पीकर वादावर योगी सरकार 'सक्त'

तसेच, भगवान हनुमानाचे संरक्षक महाराज बलबीर गिरी म्हणाले, "या लाऊडस्पीकरमुळे समाजातील शांतता भंग होत आहे. समाजातील शांतता भंग होऊ न देणं हे जनतेचं कर्तव्य आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com