बीएसएफला बंगालमध्ये घुसू देऊ नका, ममता बॅनर्जींचा पोलिसांना आदेश

बीएसएफला कारवाईपासून रोखावे; ममता बॅनर्जी
mamata banerjee police not allow bsf to enter 50 km border area
mamata banerjee police not allow bsf to enter 50 km border area Dainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा बीएसएफविरोधात वक्तव्य केलं आहे. ममता यांनी कूचबिहार जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना निर्देश दिले आणि सांगितले की, तुम्ही बीएसएफला सीमेपासून 50 किमी आत प्रवेश करू देऊ नका. बीएसएफ बांगलादेशात खेड्यापाड्यात घुसून लोकांना मारत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा मृतदेह फेकून देत आहेत. बीएसएफला हे सर्व करू देऊ नये.

ममता म्हणाल्या की, गुरे तस्करांच्या नावाखाली गोळ्या घालून ते राज्यातील इतर भागात फेकले जात असल्याचे दिसून येत आहे. माझ्या रेल्वे मंत्रालयातील वास्तव्यादरम्यान मी अशी अनेक प्रकरणे पाहिली आहेत. मृतदेह कसे गायब होतात? सीमेवरील बीएसएफची त्रिज्या 50 किमीपर्यंत वाढवण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशाला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध केला होता.

mamata banerjee police not allow bsf to enter 50 km border area
टीम इंडिया टी-20 मधून विराट कोहली पडणार बाहेर?

बीएसएफला कारवाईपासून रोखावे : ममता

याआधीही ममता बॅनर्जी बीएसएफविरोधात वक्तव्ये करत आहेत. यापूर्वी ममता यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बीएसएफच्या कारवायांवर लक्ष ठेवले पाहिजे, असे सांगितले होते. बीएसएफला त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर कारवाई करू देऊ नये, अशा सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या. कारण कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. बीएसएफने सीमेवर बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेल्या कोणत्याही गुन्हेगार, तस्कर किंवा दहशतवाद्याला अटक केली आणि त्याचे काही साथीदार अधिकार क्षेत्राबाहेर उपस्थित असतील तर त्यांना कारवाईपासून रोखले जाईल का? असा सवाल केला आहे.

शक्ती वाढवण्याबाबत विधानसभेत प्रस्ताव

नोव्हेंबर 2021 मध्ये ममता यांनी बीएसएफच्या अधिकारक्षेत्रात वाढ करण्याविरोधात विधानसभेत ठराव मांडला होता. सीमेच्या 50 किमीपर्यंतच्या परिसरात बीएसएफच्या अटक, शोध आणि जप्तीला ममता सतत विरोध करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com