देशातील 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस; यूपी-राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊसाला सुरूवात झाली आहे, तर काही राज्यांमध्ये पुन्हा उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Weather Update
Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊसाला (Rain) सुरूवात झाली आहे, तर काही राज्यांमध्ये पुन्हा उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार (Skymet Weather Services), पुढील 24 तासांत सिक्कीम, ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीपच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. (Torrential rains in these states of the country UP Rajasthan heat wave likely)

Weather Update
'प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचे?' :RSS प्रमुख मोहन भागवत

याशिवाय रायलसीमा आणि दक्षिण कर्नाटक तसेच केरळमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. दुसरीकडे, तटीय कर्नाटक, अंतर्गत तामिळनाडू, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलका ते मध्यम पाऊसाच्या सरी बरसू शकतात. तसेच राजस्थानच्या दक्षिण, पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या विविध भागात उष्णतेची लाट येऊ शकते.

गेल्या 24 तासांतील हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, अंदमान आणि निकोबार बेटांच्या उत्तरेकडील भाग, मणिपूर, मेघालय, सिक्कीमचा काही भाग केरळ आणि लक्षद्वीपच्या एक किंवा दोन भागात हलका ते मध्यम सरी बरसत आहेत. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश, कोकण, गोवा आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागात विखुरलेला पाऊस झाला.

याशिवाय, ईशान्येकडील उर्वरित भाग, तामिळनाडूचा अंतर्गत भाग, किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक, उत्तर पूर्व उत्तर प्रदेशचा काही भाग आणि झारखंडच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. दुसरीकडे, जर आपण देशभरात तयार झालेल्या हवामान प्रणालीबद्दल बोललो, तर दक्षिणपूर्व उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागावर चक्रीवादळाचे परिवलन बनले आहे.

Weather Update
मध्यप्रदेशात RTI कार्यकर्त्याची गोळ्या झाडून केली हत्या

राष्ट्रीय राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरण थंड झाले होते, मात्र अजूनही पावसाची शक्यता नाही. अशा परिस्थितीत दिल्लीतील अनेक भागात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. दिल्लीत पावसाची जागा आता कोरड्या हवामानाने घेतली, आणि त्यामुळे आगामी काळात दिल्लीतील जनतेला वाढत्या तापमानाचा सामना देखील करावा लागू शकतो. स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार तापमानात वाढ देखील दिसून येत आहे.

4 जूनच्या आसपास दिल्ली आणि एनसीआर भागात जोरदार वारे वाहू शकते, त्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊ शकते. उत्तर भारतातील बहुतांश भागात कमाल तापमान 40 अंशांच्या वर राहील आणि यापैकी काही भागात कमाल तापमान 44 आणि 45 अंशांपर्यंत पोहचू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com